राष्ट्रीय स्तरावरील कला स्पर्धेत हणखणे विद्यालयाला यश…

Goan Varta Live | प्रतिनिधी
पेडणे : मुंबई येथील रंगोत्सव सेलिब्रेशन आयोजित राष्ट्रीय पातळीवरील कला स्पर्धेत हणखणे पेडणेच्या शासकीय माध्यमिक विद्यालयाच्या एकूण १७ विद्यार्थी व विद्यार्थीनींनी वेगवेगळ्या कलांमध्ये प्राविण्य दाखवत चांगले यश प्राप्त केले आहे.
हेही वाचाःDelhi Murder : पतीला संपवून मृतदेहाचे तुकडे ठेवले फ्रिजमध्ये; असा झाला खूनाचा उलगडा…
‘या’ विद्यार्थ्यांना कला पदक पुरस्कार सहीत चषक
आदित्य नीरपाल यास कार्टून मेकिंग मध्ये व राज काकेरिकर यास कोलार्ज मेकिंग मध्ये कला पदक पुरस्कार सहीत चषक प्राप्त झाले. प्रेम काकेरीकर, सारा नाईक, प्रज्योत धावुस्कर, रोशनी श्रीवंत, अन्नपूर्णा राठोड, पुष्पलता सावंत, हर्ष गावडे, सिद्धी नाईक, सज्जन सावंत, शर्वरी नाईक, या सर्वाँना सुवर्ण पदक प्राप्त झाले. विघ्नेश नाईक, आर्या नाईक, प्रथमेश नाईक, जगन्नाथ धुरी, श्रेया गावस यांना रौप्य पदक प्राप्त झाले.
हेही वाचाःआयुष हॉस्पिटलचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते ११ रोजी उद्घाटन…
विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कला स्पर्धेसाठी निवड
या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक कृष्णा लांजेकर यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या संघातील विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक नरेंद्र नाईक आणि विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि पालक शिक्षक संघ यांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे. या सर्व विद्यार्थ्यांची निवड आंतरराष्ट्रीय स्तरावरील कला स्पर्धेसाठी झाल्याचे आयोजकांनी कळविले आहे.
हेही वाचाःघाटेश्वरनगर-खोर्ली येथे बस कलंडली…