वेदांताकडून जीएमसीत 100 अद्ययावत बेड्सचं वितरण

10 व्हेंटिलेटर्स, जम्बो ओ2 सिलिंडर्स, मॉनिटर्स, एक्सरे मशीन, डिफिब्रिलेटर्स इत्यादींचा समावेश

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्यातील कोविड महामारीशी दोन हात करण्यासाठी अनेक मोठ्या कंपनी स्वतःहून पुढे येऊन गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला (जीएमसी) मदतीचा हात पुढे करत आहेत. राज्यातील अशाच एका मोठ्या आणि नावाजलेल्या कंपनीने त्यांच्या सीएसआर फंड्स अंतर्गत जीएमसीला मदतीचा हात देऊ केलाय. शुक्रवारी या कंपनीने जीएमसीला 100 अद्ययावत बेड्स हस्तांतरित केल्यात.

‘वेदांता केअर्स’कडून जीएमसीत 100 बेड्सचे वितरण

राज्यातील वेदांता सेसा गोवा लि. ही कंपनी या कोविड महामारीत राज्य सरकारच्या मदतीसाठी पुढे आली आहे. या कंपनीने आपल्या सीएसआर फंडातून ‘वेदांता केअर्स’ अंतर्गत जीएमसीतील सुपर स्पेशालिटी ब्लॉकला 100 अद्ययावत बेड्स हस्तांतरित केल्यात. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या बेड्स वेदांता आयर्न अँड स्टील सेक्टरचे सीईओ सौविक मजूमदार यांच्या हस्ते स्विकारल्या.

सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये 100 अद्ययावत बेड्स

वेदांता समूहाकडून जीएमसीतील सुपर स्पेशालिटी ब्लॉकसाठी 100 अद्ययावत बेड्सचं वितरण करण्यात आलंय. या वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये 10 व्हेंटिलेटर्स, जम्बो ओ2 सिलिंडर्स, मॉनिटर्स, एक्सरे मशीन, डिफिब्रिलेटर्स इत्यादींचा समावेश आहे. तसंच 20 बेड्ड क्रिटिकल आयसीयू सेटअपची पूर्ण क्षमता समाविष्ट आहे. वेदांताने दिलेली ही मदत जीएमसीत येणाऱ्या कोविडबाधितांसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. आजपर्यंत वेदांताने 100 टन लिक्विड ऑक्सिजन राज्याला पुरवलाय. तसंच राज्यातील कोविड लसीकरणाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वेदांताकडून लसीकरण मोहिमही हाती घेतली जातेय. या पुढेही कोविड लढ्यात राज्याला लागेल तेवढा ऑक्सिजन वेदांता-सेसाच्या आमोणा नावेली प्लांटमधून पुरवण्याची हमी यावेळी मुजुमदार यांनी बोलताना दिलीये.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, गोवा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, सांताक्रुजचे आमदार आंतोनिओ फर्नांडिस, सांतांद्रे आमदार फान्सिस्को सिल्वेरा, वेदांता सेसा गोवाचे सिनिअर जनरल मॅनेजर संदीप जैन, वेदांता आयर्स अँड ओरचे डेप्युटी सीईओ सुजल शहा इ. मान्यवर उपस्थित होते.  यावेळी कोविड लढ्यात गोव्याच्या मदतीला उभं राहण्याची, या चांगल्या कामात योगदान देण्याची संधी वेदांताला दिल्याबद्दल मुजुमदार यांनी मुख्यमंत्री तसंच आरोग्यमंत्र्यांचे आभार मानले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!