मोरजीत गटाराचे तीनतेरा, पाणी रस्त्यावर

गटार व्यवस्था कोलमडली; पावसाचं पाणी साचलं रस्त्यावर

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः सरकार दरवर्षी राज्यात रस्त्याशेजारील गटारांवर कोटी रुपये खर्च करून ते पैसे पाण्यात घालतं. कोटी रुपये खर्च करूनही गावागावातील वाड्यावाड्यावरील गटारांचे तीनतेरा वाजलेत. कुणीच याकडे लक्ष देत नसल्यानं अधुनमधुन पडत असलेल्या पावसाचं पाणी रस्त्यावर साचून राहतं, पाण्याचा अंदाज येत नसल्यानं वाहनचालकांनाही त्याचा बराच त्रास होतो. याकडे सार्वजनिक बंधकाम रस्ता विभाग आणि पंचायतीने लक्ष घालून उपाय योजना करावी, अशी स्थानिकांकडून मागणी होतेय.

हेही वाचाः सावंत सरकारात कोरोना काळातही विकासाला गती

रस्त्यावर पाणीच पाणी

मोरजी पंचायत क्षेत्रातील नवेवाडा मोरजी येथील मुख्य रस्त्यावरील गटार व्यवस्था कोलमडल्यानं नुकताच पाऊस पडून गेला तेव्हा ते पाणी रस्त्यावर आलं. रस्ता करताना सार्वजनिक बांधकाम रस्ता विभागाने गटार व्यवस्था केली नसल्यानं पावसाचं पाणी रस्त्यावर साचतंय. सरकारच्या सार्वजनिक बांधकाम रस्ता विभाग आणि मोरजी पंचायतीने यावर तातडीने उपाय योजना करून पाण्याचा निचरा करावा, अशी स्थानिकांनी मागणी केलीये. मोरजी पंचायत क्षेत्रात मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला बांधकामं सुरू आहेत. या बांधकामांना कुणाचा विरोध नाही. मात्र बांधकामं करताना पाण्याचा निचरा कसा होईल याकडे कुणीच लक्ष देत नाही.

हेही वाचाः स्थानिकांना नको असल्यास प्रकल्प आणू देणार नाही

आश्वे दोन तीन ठिकाणी पाणी रस्त्यावर

मांद्रे पंचायत क्षेत्रातील आश्वे किनारी भागातीलही गटार व्यवस्था कोलमडल्याने एकूण तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकत्याच पडलेल्या पावसाचं पाणी साचून राहिलेलं आहे. यावर पंचायतीने लक्ष घालून त्यावर योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी होतेय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!