‘अभिनव कला मंदिर’चा गुरुपौर्णिमा कार्यक्रम

बोरी येथील राघवेंद्र स्वामी सभागृहात कार्यक्रम; ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4 वाजता कार्यक्रमाची सुरुवात

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडाः ढवळी येथील ‘अभिनव कला मंदिर’ या संगीत संस्थेचा वार्षिक गुरुपौर्णिमा कार्यक्रम 7 आणि 8 ऑगस्ट 2021 रोजी आयोजित करण्यात आला आहे. बोरी येथील राघवेंद्र स्वामी सभागृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 7 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4 वाजता कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.

हेही वाचाः त्रास देणं हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा होत नाही

7 ऑगस्ट रोजी पहिलं सत्र

पहिल्या सत्रात, विद्यालयाचे विद्यार्थी अद्वैत घैसास, अतीक्ष शेणॉय, मैथिली आमशेकर, साक्षी देसाई, हृषीकेश ढवळीकर, आर्या बोरकर, उर्वी उमर्ये, चैतन्य कोरडे, आणि अपुर्वा गुले आपलं शास्त्रीय गायन सादर करणार आहेत. सत्राच्या समारोपात गुरु ऋग्वेदा देसाई यांचं शास्त्रीय गायन होणार आहे.

8 ऑगस्ट रोजी दुसरं आणि तिसरं सत्र

दुसरं सत्र 8 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता सुरु होईल. या सत्रात प्रयाग कार्लेकर, पूजा सहकारी, श्रीजा फडते, प्रवरा बखले, वैष्णवी देसाई, नीती कोरडे, मेघा गोब्रे आणि पृथा गांवकर या विद्यार्थ्यांचं शास्त्रीय गायन सादरीकरण होईल. सत्राचा समारोप गुरु नितीन ढवळीकर यांच्या शास्त्रीय गायनाने होईल. या सत्रानंतर कार्यक्रमाचा औपचारिक समारंभ होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध समाजकार्यकर्ते आणि संगीतप्रेमी दिवाकर शिंक्रे उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी 4 वाजता सुरु होणार्‍या तिसर्‍या सत्रात मेखला अध्यापक, तृषा देसाई, उर्वी देसाई, निधी शिंक्रे, अर्या अभिषेकी, अमृता जोग, रिया धारेश्वर, दिव्या मावजेकर, कीर्ती शानबाग आणि किरण रायकर हे विद्यार्थी आपलं शास्त्रीय गायन सादर करतील. तिसर्‍या सत्राचा तसंच गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचा समारोप गुरु मुग्धा गांवकर यांच्या गायनाने होईल.

हेही वाचाः डिचोली भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी अनिकेत चणेकर

या दोन दिवसीय कार्यक्रमात अनय घाटे, अनुराग देसाई, दीपक पेंडसे आणि गोपाळ प्रभू हे कलाकारांना संवादिनी साथ करणार आहेत. तर ऋषिकेश फडके, अभिजित एकावडे, शशांक उपाध्ये आणि मिलिंद परब यांची तबला साथ असेल.

सर्व संगीतप्रेमी आणि रसिकांनी या कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थिती लावावी असं आवाहन ‘अभिनव कला मंदिर’तर्फे करण्यात आलं आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | POLITICS | भाजपला घेरण्यासाठी गोवा फॉरवर्ड सक्रिय

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!