गोव्यात गुरूनानक जयंती उत्साहात साजरी

गुरूव्दारांत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो; मुक्तीलढयापासुन आजअखेर गोव्याच्या प्रगतीत शीख बांधवांचे योगदान आहे. कोणत्याही अडचणीसाठी आजही गोवेकरांना मदत करण्यासाठी शीख बांधव वचनबध्द असल्याची ग्वाही गुरूदवाराचे अध्यक्ष हरविंदरसिंग धाम यांनी दिलीये. गोव्यात गुरूनानक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

गुरूनानक जयंतीनिमित्ताने बेतुल आणि वास्को येथील गुरूदवारांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पर्वरीचे आमदार रोहन खवंटे यांनीही भेट देवून शीख बांधवांना शुभेच्छा दिल्या. गुरूदवाराच्या माध्यमातुन चालवल्या जाणाÚया विविध उपक्रमांची माहिती देताना श्री. धाम म्हणाले की, सर्व धर्मांचे सार शीख धर्मात आहे. तो वेगळा धर्म नाही. मानवता हीच त्याची ओळख आहे. गोव्याची भूमी आणि शीख बांधव यांचे खुप जवळचे नाते आहे. अगदी गोवा मुक्ती लढयापासून शीख बांधव आजही गोवेकरांच्या पाठीशी आहेत. लवकरच सर्वांसाठी गुरूदवारेमार्फत उच्च दर्जाचे संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांना गोव्याचे सरकार आणि लोकप्रतिनिधी यांचे अतिशय चांगले सहकार्य मिळते आहे. यावेळी आमदार रोहन खवंटे यांनीही गुरूदवाराला भेट देवून शीख बांधवांना गुरूपर्वाच्या शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा

बाकीबाब यांच्या कवितेवरील व्हिडीओ गीताचे शानदार प्रकाशन

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!