गुणाजी मंद्रेकर यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुणगौरव

भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचा राष्ट्रीय युवा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल केलं सन्मानित

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः नेहरू युवा केंद्रातर्फे आयोजित केलेल्या ‘युवा गुणगौरव’ कार्यक्रमात स्वयंसेवक गुणाजी मांद्रेकर यांना भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचा राष्ट्रीय युवा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, नेहरू युवा केंद्र संघटनेचे उपसंचालक कालिदास घाटवळ, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, डॉन बॉस्को समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. पंकज कुंभार, इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाचे संस्थेचे अध्यक्ष दशरथ परब व्यासपीठावर उपस्थित होते.

हेही वाचाः तुयेतील ‘ती’ घरं ९० वर्षानंतर आज होणार प्रकाशमान

गुणाजी मांद्रेकरांचा अल्प परिचय

गुणाजी मांद्रेकर हे नेहरू युवा केंद्राचे सक्रिय स्वयंसेवक आहेत. तसंच विद्यार्थी दशेतही त्यांनी म्हापसा येथील सेंट झेव्हियर्स कॉलेज आणि गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळावर प्रतिनिधित्व केलं आहे. रक्तदान शिबीर, आरोग्य शिबिर, व्यवसाय प्रशिक्षण, वृक्षारोपण कार्यक्रमांद्वारे वन महोत्सव, स्वच्छ भारत अभियान, नशा मुक्त भारत अभियान तसंच इतर मुद्द्यावर आधारित जनजागृती अभियान, व्यक्तीमत्व आणि नेतृत्व शिबीर, एक भारत श्रेष्ठ भारत या आंतरराज्य आदान-प्रदान, राष्ट्रीय एकता शिबिर, केंद्रीय समाजकल्याण मंत्रालयातर्फे दिल्ली येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय नशा मुक्त भारत कार्यशाळेत गुणाजी मांद्रेरकर यांनी गोव्याचं प्रतिनिधीत्व केलं होतं. तसंच क्षेत्रीय प्रचार कार्यालयातर्फे विविध सामाजिक समस्यांवर जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित केले होते. अशा विविध कार्यक्रमांद्वारे युवा विकासाचं कार्य गुणाजी मांद्रेकरांनी केलं आहे.

गुणाजी मांद्रेकरांच्या या कार्याची दखल घेऊन नेहरू युवा केंद्राने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ‘उत्कृष्ट स्वयंसेवक’ म्हणून यांचा सत्कार केला होता. नाशिक महाराष्ट्राच्या भावना बहुउद्देशीय संस्थेतर्फे ‘सेवा रत्न’ पुरस्काराने गुणाजी यांचा गौरव करण्यात आला होता. तसंच गोवा राज्याच्या शासनाच्या समाजकल्याण खात्यातर्फे ‘उत्कृष्ट समाजसेवक’ पुरस्काराने गोवा मुक्तीदिनी मुख्यमंत्र्याच्या हस्ते गुणाजी मांद्रेकर यांना सन्मानित केलं होतं.

हेही वाचाः ACCIDENT | काणकोण गुळे येथे १४ गुरांचा मृत्यू

यावेळी पंकज सायनेकर, डॉ. सर्वानंद सावंत देसाई, प्रेरणा पालेकर आणि तनवेश वेंगुर्लेकर यांचाही विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार केला.

हा व्हिडिओ पहाः Video | Flood Effect 2021 | Bicholim | ‘निकषांच्या पलिकडे जाऊन मदत देण्याचा प्रयत्न करु’

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!