पुन्हा कोरोनाचा उद्रेक, गुजरातहून येणाऱ्या पर्यटकांच्या वाढत्या संख्येनं चिंता?

गुजराती पर्यटकांमुळे कोरोना राज्यात पुन्हा पसरण्याची भीती?

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी आहे. राज्यात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. अशातच आता गुजरात राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येण्याचं प्रमाण वाढलंय. त्याच पार्श्वभूमीवर गुजरात सरकारनं चार प्रमुख शहरांत संचारबंदीचाही निर्णय घेतलाय. मात्र या सगळ्यात गुजरातमधून येणाऱ्या पर्यटकांमुळे गोव्यातही कोरोनाचा संसर्ग वाढेल, अशी भीती व्यक्त केली जाते आहे.

गोव्याला भीती?

गुजरातमध्ये कोरोना रुग्णसंख्यांची पुन्हा एकदा वाढू लागले आहे. नव्या रुग्णांच्या लक्षणीय वाढीमुळे गुजरात सरकारनंही आधी खबरदारीची पावलं उचलली आहेत. गुजरातच्या चार प्रमुख शहरांमध्ये रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे. या संचारबंदीमुळे आता कोरोना आटोक्यात आणण्यात मदत होईल, असा अंदाज बांधला जातो आहे. मात्र गोवा राज्याच्या दृष्टीनं गुजरातमधील कोरोनाचे रुग्ण वाढणं, ही चिंताजनक गोष्ट मानली जाते आहे. अहमदाबाद, सुरत, बडोदरा आणि राजकोट या चार शहरांमध्ये मध्यरात्री ते पहाटे 6 वाजेपर्यंत ही संचारबंदी कायम असणार आहे. सध्याच्या घडीला गुजरातमध्ये साधारणपणे सरासरी 11 हजार नवे रुग्ण आढळून येत आहेत.

काय काळजी घेणार?

गुजरातचे मुख्यमंत्री विपय रूपाणी यांनाही कोरोनाची लागण झालीय. अशातच गुजरातमधून गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. या अनुषंगाने गोवा राज्य सरकार काही महत्त्वाची पावलं उचलतं का, हे पाहणं महत्त्वाचंय. दरम्यान, गुजरातमधून येणाऱ्या पर्यटकांमुळे कोरोना पसरणार नाही, याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असल्याची मत व्यक्त केलं जातंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!