गुजरात साहित्य परिषदेनं ‘त्या’ कवयित्रीला ठरवलं ‘नक्षली’

'साहेब तुम्हारे रामराज में शव-वाहिनी गंगा' या कवितेतून अराजकता पसरवल्याचा आरोप

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : “साहेब तुम्हारे रामराज में शव-वाहिनी गंगा” सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेली गुजराती कवयित्री पारुल खाक्कर यांची ही कविता तुम्ही वाचलीच असेल. पण, या कवयित्रीला आता गुजरात साहित्य परिषदेने ‘नक्षली’ ठरवलं आहे. गुजरात साहित्य परिषदेनं पारुल खाक्कर यांच्यावर अराजकता पसरवल्याचा आरोप केलाय.

परिषदेने आपल्या ‘शब्दसृष्टी’ या नियतकालिकाच्या संपादकीयमध्ये म्हटलंय की, “या कवितेत ज्या प्रकारच्या शब्दांचा वापर करण्यात आलाय तो कवितेला शोभत नाही. अशा प्रकारची विचारसरणी केवळ केंद्र सरकारच्या विरोधी विचारसरणीत आहे. हा विचार नक्षली साहित्यिकांचा आहे. ही कविता नसून अराजकता पसरवण्याचा प्रकार आहे. ही कविता कोणत्याच दृष्टीकोनातून कविता नाहीये. हा केवळ विनाकामाचा आक्रोश आहे.”

पारुल खक्कर यांच्या छोट्या काव्याने गुजरातमध्ये एक वादळ निर्माण केलं. गंगा नदीत अनेक मृतदेह वाहताना पाहून देशभरात खळबळ उडाली. मृतदेहांची अशी अवस्था पाहून अनेकजण हळहळले. याच घटनेवर गुजरातच्या कवयित्री पारुल खक्कर यांनी लिहीलेली कविता देशभरात गाजली. अनेक भाषांमध्ये या कवितेचं भाषांतरही झालं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!