गोवा श्रमिक पत्रकार संघटनेतर्फे ‘गूज पत्रकार’ पुरस्कारांची घोषणा

फोमेंतो मीडियाच्या 5 पत्रकारांना पुरस्कार; शनिवारी केली पुरस्कारांची घोषणा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गोवा श्रमिक पत्रकार संघटने (गूज) कडून शनिवारी वर्षं 2018, 2019 आणि 2020 साठीच्या ‘गूज पत्रकार’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आलीये. येथील गूजच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात हे पुरस्कार जाहीर करण्यात आलेत. फोमेंतो मीडियाच्या एकूण 5 पत्रकारांना हे पुरस्कार मिळालेत. या पत्रकारांंच्या यादीत ‘द गोवन एव्हरीडे’चे छाया पत्रकार नारायण पिसुर्लेकर, ‘गोवन वार्ता’चे प्रसाद शेट काणकोणकर, तर ‘प्रुडंट मीडिया’चे विश्वनाथ नेने, ओमकार फळारी आणि तुकाराम मराठे यांना वेगवेगळ्या विभागात पुरस्कार जाहीर झालेत.

हेही वाचाः तिलारी धरणाचे दरवाजे उघडले ही अफवाः कोरगांवकर

फोमेंतो मीडिया समूहाच्या 5 पत्रकारांना पुरस्कार

उत्कृष्ट पर्यावरणीय छायाचित्रणासाठी ‘द गोवन एव्हरीडे’चे छाया पत्रकार नारायण पिसुर्लेकर यांना 2018 वर्षासाठीचा सिरिल डिकुन्हा यांच्या सन्मानार्थ दिला जाणारा पुरस्कार जाहीर झालाय. गुन्हे पत्रकारितेत “सावध रहा! समजून चोऱ्या फसवणूकीचे फंडे” या रिपोर्टसाठी ‘गोवन वार्ता’चे प्रसाद शेट काणकोणकर यांना 2020 वर्षासाठी औदुंबर शिंदे यांच्या सन्मानार्थ दिला जाणारा पुरस्कार जाहीर झालाय. उत्कृष्ट टीव्ही/डीजिटल पत्रकारितेसाठी ‘प्रुडंट’चे विश्वनाथ नेने यांना त्यांच्या ‘म्हादई रिपोर्ट’साठी 2019 वर्षासाठीचा पुरस्कार जाहीर झालाय. तर 2020 वर्षासाठीचा उत्कृष्ट टीव्ही/डीजिटल पत्रकारितेसाठीचा पुरस्कार ‘प्रुडंट’चे ओमकार फळारी आणि तुकाराम मराठे यांना त्यांच्या ‘म्हादई डायव्हरजन’ या रिपोर्टसाठी प्राप्त झालाय.

ज्येष्ठ पत्रकार संदेश प्रभुदेसाई आणि ज्येष्ठ फोटो पत्रकार संदीप नाईक यांनी परिक्षकांची भूमिका पार पाडत या पुरस्कारांची घोषणा केली आहे. 2018, 2019 आणि 2020 साठीच्या ‘गुज पत्रकार पुरस्कार’ वितरण समारंभाच्या तारीखेची घोषणा अद्याप केलेली नाही. तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचं गूज कडून यावेळी सांगण्यात आलं.

हेही वाचाः PROUD MOMENT | राजतिलक नाईक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

2018 वर्षासाठीचे ‘गूज पत्रकार पुरस्कार’

उत्कृष्ट पर्यावरणीय पत्रकारिता – ‘गोव्याच्या शहरांमध्ये आणि गावांमधील हवेची गुणवत्ता बिघडत आहे’ या रिपोर्टसाठी ‘नवहिंद टाईम्स’च्या अब्दुल वाहब खान यांना फेलिसिओ कार्दोझ यांच्या सन्मानार्थ दिला जाणारा पुरस्कार.

उत्कृष्ट शोध पत्रकारिता – ‘श्री. साहनी यांचे घर’ या रिपोर्टसाठी ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या गौरी मळकर्णेकर यांना लॅम्बर्ट मॅस्केअरन्हास यांच्या सन्मानार्थ दिला जाणारा पुरस्कार.

उत्कृष्ट ग्रामीण पत्रकारिता – ‘फोंड्यातील 73 अंगणवाड्यांमध्ये टॉयलेट नाही’ या रिपोर्टसाठी ‘नवहिंद टाईम्स’च्या निर्घोष गावडे यांना सुरेश वाळवे यांच्या सन्मानार्थ दिला जाणारा पुरस्कार.

हेही वाचाः सावधान! महाराष्ट्रासह देशात कोरोनाची तिसरी लाट?

2019 वर्षासाठीचे ‘गूज पत्रकार पुरस्कार’

उत्कृष्ट पर्यावरणीय पत्रकारिता – ‘मांडवीला दूषित करणारे कोळशाचे कण’ या रिपोर्टसाठी जेरार्ड डिसोझा यांना फेलिसिओ कार्दोझ यांच्या सन्मानार्थ दिला जाणारा पुरस्कार.

उत्कृष्ट पर्यावरणीय छायापत्रकारिता – ‘लोकमत’चे छायाचित्रकार गणेश शेटकर यांना सिरिल डिकुन्हा यांच्या सन्मानार्थ दिला जाणारा पुरस्कार.

उत्कृष्ट शोध पत्रकारिता – ‘घोस्ट इंडस्ट्रीअल इस्टेट्स’ या रिपोर्टसाठी ‘द टाईम्स ऑफ इंडिया’च्या न्यूटन सिक्वेरा यांना लॅम्बर्ट मॅस्केअरन्हास यांच्या सन्मानार्थ दिला जाणारा पुरस्कार.

उत्कृष्ट छाया पत्रकारिता – ‘लोकमत’चे छायाचित्रकार गणेश शेटकर यांना पुरस्कार

उत्कृष्ट ग्रामीण पत्रकारिता – ‘तुये औद्योगिक वसाहतीची घृणास्पद कहाणी’ या रिपोर्टसाठी ‘हेराल्ड’च्या सुरज नांद्रेकर यांना सुरेश वाळवे यांच्या सन्मानार्थ दिला जाणारा पुरस्कार.

उत्कृष्ट कला आणि संस्कृती पत्रकारिता – ‘पेन्साओः इनहेरिटिंग अ लेगसी ऑफ प्रेईंग फॉर अननोन प्रॉपर्टी बेक्वेर्थ्स’ या रिपोर्टसाठी ‘द टाईम्स ऑफ इंडिया’च्या मार्कस मर्गुल्हाओ यांना पुरस्कार.

उत्कृष्ट गुन्हे पत्रकारिता – ‘केशरी चपलांच्या जोडीने स्कार्लेट कीलिंग प्रकरणात आरोपीला कसे दोषी ठरविण्यात आले’ या रिपोर्टसाठी ‘हिंदुस्थान टाईम्स’च्या जेरार्ड डिसोझा यांना औदुंबर शिंदे यांच्या सन्मानार्थ दिला जाणारा पुरस्कार.

उत्कृष्ट लेआऊट आणि पेज डिझाईन – ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या शर्मिला कुतिन्हो यांना पुरस्कार

उत्कृष्ट क्रीडा पत्रकारिता – ‘अ गेम ऑफ यू-टर्न्स’ या रिपोर्टसाठी ‘हेराल्ड’च्या अनंत बखले यांना पुरस्कार

हेही वाचाः Tokyo Olympics 2021: डिस्कस थ्रोच्या फायनलमध्ये भारताची कमलप्रीत कौर

2020 वर्षासाठीचे ‘गूज पत्रकार पुरस्कार’

उत्कृष्ट पर्यावरणीय पत्रकारिता – ‘रिव्हेंज ऑर कव्हर-अप’ या रिपोर्टसाठी ‘हेराल्ड’च्या सुरज नांद्रेकर यांना फेलिसिओ कार्दोझ यांच्या सन्मानार्थ दिला जाणारा पुरस्कार.

उत्कृष्ट पर्यावरणीय छाया पत्रकारिता – ‘द टाईम्स ऑफ इंडिया’चे छायाचित्रकार राकेश मुंड्ये यांना सिरिल डिकुन्हा यांच्या सन्मानार्थ दिला जाणारा पुरस्कार.

उत्कृष्ट शोध पत्रकारिता – ‘द अनसंग हिरोज गोवा हॅज फेल्ड टू थॅंक’ या रिपोर्टसाठी ‘हेराल्ड’च्या सुरज नांद्रेकर यांना लॅम्बर्ट मॅस्केअरन्हास यांच्या सन्मानार्थ दिला जाणारा पुरस्कार.

उत्कृष्ट छाया पत्रकारिता – ‘गोवा टाईम्स (टीओआय)’चे छायाचित्रकार उपेंद्र नाईक यांना पुरस्कार.

उत्कृष्ट ग्रामीण पत्रकारिता – ‘विथ इच क्रशिंग सिझन, होप्स ऑफ सांगे केन फार्मर्स गेट फरदर क्रश्ड’ या रिपोर्टसाठी ‘हेराल्ड’च्या आल्फ्रेड फर्नांडिस यांना सुरेश वाळवे यांच्या सन्मानार्थ दिला जाणारा पुरस्कार.

उत्कृष्ट व्यंगचित्रकारिता – ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या शर्मिला कुतिन्हो यांना पुरस्कार.

उत्कृष्ट लेआऊट आणि पेज डिझाईन – ‘हेराल्ड’च्या मनोज शिरोडकर यांना पुरस्कार.

उत्कृष्ट क्रीडा पत्रकारिता – ‘गोव्यातील फूटबॉलमधील मॅट-फिक्सिंगः सुंदर खेळ त्याची कुरूप बाजू दर्शवतो’ या रिपोर्टसाठी ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या मार्कस मर्गुल्हाओ यांना पुरस्कार.

हा व्हिडिओ पहाः Video | Congress help flood victims | वाळपईत कॉंग्रेस धावली पुरग्रस्तांच्या मदतीला

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!