मोठी कारवाई! GST चोरीप्रकरणी गोव्यात पहिल्यांदाच दोघांना अटक

तब्बल २० कोटी ९६ लाख रुपयांची जीएसटी चोरी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : तुम्ही जर जीएसटी वेळेत भरत नसाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण राज्यात जीएसटी चोरी प्रकरणी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तब्बल २० कोटी ९६ लाख रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून आतापर्यंतची गोव्यातही ही पहिलीच मोठी कारवाई आहे.

हेही वाचा : Superfast | महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा

कुणावर कारवाई?

मुख्तार ऑटोमोबाईल प्रायव्हेट लिमिटेड, वेर्णा या कंपनीच्या दोघा डायरेक्टर्सना गोवा राज्य कर विभागानं अटक केली. मुख्तार शेख आणि महीद अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहे. २०१७ पासून त्यांनी जीएसटी चोरी केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान अटकेनंतर या दोघांनाही जेएमएफसी कोर्टात हजर करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी सर्शत जामीन देण्यात आल्याची माहिती मिळतेय. आतापर्यंतचं व्याज आणि इतक गोष्टी पकडून अटक करण्यात आलेल्या दोघांनीही तब्बल २० कोटी ९६ लाख रुपयांची जीएसटी चोरी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा : अनमोड घाटमार्ग बुधवारपासून अवजड वाहतुकीसाठी बंद

गोवा गुड्स एन्ड सर्विस टँक्स कायद्याअंतर्गत 132(1) (c) and 132 (1) (d) प्रमाणे या दोघांवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जीएसटी चुकवणं, टँक्स क्रेडीटमध्ये गडबडी करणं याचा ठपका या दोघांवरही ठेवण्यात आलाय. गोवा जीएसटी कायद्याच्या कलम ६९ अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, आता या दोघांची चौकशीही करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जीएसटी कर चुकवणाऱ्यांना चांगलाच दणका बसलाय. त्यामुळे जीएसटी चुकवणाऱ्यांनी वेळीच यातून बोध घ्यावा, अशी भावना व्यक्त केली जाते आहे. येत्या काळात अशाप्रकारणे जीएसटी चोरी केल्याप्रकरणी कारवाई वेग येण्याची शक्यता असल्याचं, विश्वसनीय सूत्रांनी म्हटलंय.

हेही वाचा : CORONA UPDATE | गुरुवारी राज्यात 4 कोविडबाधितांचा मृत्यू

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!