OXYGEN | ‘जीएसएल गोवा’ प्रदान करणार ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

कोविडच्या पार्श्वभूमीवर जीएसएलची घोषणा; कोविड-19 रुग्णालयांसाठी देणार ऑनसाइट ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) या एमओडी पीएसयूने गोवा राज्य सरकारला कोविड- 19 महामारीविरूद्धच्या लढाईत मदत करणार असल्याचं जाहीर केलंय. जीएसएलकडून अंदाजे 100.00 लाख रुपये खर्च करून कोविड-19 रुग्णालयांसाठी ऑनसाइट ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प प्रदान करण्यात येणार असल्याचं जीएसएलकडून सांगण्यात आलंय.

OXYGEN
OXYGEN

प्रति मिनिट ९६० लिटर वैद्यकीय ऑक्सिजनची निर्मिती

प्रस्तावित ऑक्सिजन प्रकल्पांत प्रति मिनिट ९६० लिटर वैद्यकीय ऑक्सिजन तयार होईल. हा प्रकल्प जीएसएलद्वारे एका महिन्याच्या आत स्थापन केला जाईल, असं केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितलं.

हेही वाचाः धक्कादायक! लोकप्रिय न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन

जीएसएलकडून 40 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स

वैद्यकीय ऑक्सिजनची निकड लक्षात घेता गोवा शिपयार्ड लिमिटेड गोवा सरकारला अंदाजे 26.00 लाख रुपये खर्च करून 40 “ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स” पुरवत आहे, त्यापैकी 4 यापूर्वीच गोव्यात आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचं केंद्रीय मंत्री नाईक म्हणाले.

हेही वाचाः राजकारण बाजूला ठेवून गरजूंना मदत करा

जीएसएलकडून 25 बेड असलेलं आयझोलेशन सेंटर

यामुळे गोवा सरकारचा कोविड- 19 विरुद्धचा लढा मजबूत होईल. शिवाय कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी जीएसएलच्या झुआरीनगर येथील युनिट lll येथे 25 बेड असलेले आयसोलेशन सेंटर तयार ठेवण्यात आलं असल्याचं केंद्रीय मंत्री नाईक यांनी नमूद केलं.

ऑक्सिजन अभावी अनेक कोविड रुग्णांचा मृत्यू होतोय. राज्यात ऑक्सिजनची तीव्र टंचाई निर्माण झाली असल्याने या पार्श्वभूमीवर जीएसएस कडून उभारण्यात येणारे हे ऑनसाईट ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कोविड रुग्णांसाठी वरदान ठरणार आहेत.

हेही वाचाः CORONA UPDATE | बापरे! देशात 24 तासांत ३ हजार पेक्षा जास्त जणांचा मृत्यू

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!