मेळावलीवासीयांना वाढता पाठिंबा..

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजीः शेळ मेळावतीली लोक आपल्या जमिनी वाचवण्याकरिता राज्य सरकारने होऊ घातलेला आयआयटी प्रकल्पाला विरोध करत आहेत. या प्रकल्पाला विरोध करताना मेळावलीवासीयांनी मोर्चा काढला. त्यांना रोखण्यासाठी आलेल्या पोलिसांवर दंडुके, कोयते, मिरची पुडीचे पाणी वापरून हल्ला केला. या प्रकारानंतर मुख्यमंत्र्यांनी मेळावलीवासीयांनी गंभीर गुन्हे दाखल केले. मोठं पाऊल उचलत मेळावलीवासीयांनी गोमंतकीयांकडे मदतीसाठी आवाहन केलं. गोव्यातील बर्याच संस्थांनी मेळावलीवासीयांना पाठिंबाही दर्शवलाय. सुरुवातीला मेळावलीवासीयांना पाठिंबा दर्शवण्यासाठी सत्तरीच्या म्हावशे गावचे ग्रामस्थ पुढे आले होते. आता या भागातील अजून गाव मेळावलीवासीयांना पाठिंबा देण्यासाठी म्हावशेवासीयांसोबत जोडले गेलेत.
धामशेवासी पुढे सरसावले…
ज्या प्रकारे लोक मेळावलीवासीयांना पाठिंबा देण्यासाठी पुढे येतायत, ते थक्क करणारं आहे. आजही मेळावलीत तणावपूर्ण शांतता आहे. सकाळी म्हावशेतील ग्रामस्थ मेळावलीवासीयांना पाठिंबा देण्यासाठीत मेळावलीच्या दिशेने रवाना झाले होते. आता त्यांच्या हातात हात मिळवत धामशेतील ग्रामस्थही पुढे सरसावलेत. म्हावशे आणि धामशे या दोन्ही गावातील लोकांनी एकत्र येत मेळावलीवासीयांना पाठिंबा दिलाय.
काय होणार आज?
शेळ-मेळावलीत होऊ घातलेल्या आयआयटी प्रकल्पाला विरोध दर्शवताना मेळावलीवासीयांनी मोर्चा काढला. सुरुवातीला मेळावलीवासी एकट्यानेच सरकारविरुद्ध उभे राहिले होते. मेळावलीवासीयांनी पोलिसांवर दंडुके, कोयते, मिरची पुडीचे पाणी वापरून हल्ला केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मेळावलीवासीयांनी गंभीर गुन्हे दाखल केलेले. या विरोध करण्यासाठी मेळावलीवासीयांनी गोमंतकीय बांधवांकडून मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला आज प्रतिसाद मिळताना दिसतोय. सकाळी म्हावशे ग्रामस्थ मेळावलीवासीयांसाठी धावल्यानंतर आता धामशेवासी मेळावलीच्या दिशेने निघालेत. त्यामुळे आज पुन्हा मेळावली प्रकरण पेटून उठण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजच्या दिवसात मेळावलीत काय होईल, याची प्रतिक्षा सगळ्यांनाच आहे.