एफटीआयआयच्यावतीने इफ्फीदरम्यान दिव्यांगांसाठी आयोजित कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद…

मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण

Goan Varta Live | प्रतिनिधी

पर्वरी : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि गोवा मनोरंजन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सेंटर फॉर ओपन लर्निंग उपक्रमाअंतर्गत इफ्फीदरम्यान दिव्यांगांसाठी आयोजित कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद मिळाला.
हेही वाचाःTarun Tejpal case : सुनावणी इन कॅमेरा घेण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली…

ऑटिझम असलेल्या लोकांसाठी कार्यशाळेचे आयोजन

यंदाच्या 53 व्या इफ्फीत ऑटिझम असलेल्या लोकांसाठी स्मार्टफोन फिल्म मेकिंग आणि व्हीलचेअर वापर करणाऱ्यांसाठी स्क्रीन ॲक्टिंगची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. दिव्यांगांसाठी आयोजित कार्यशाळेचा सांगता समारंभ सोमवारी पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरूप्रसाद पावसकर, सचिव तहा हाजिक, एफटीआयआय रजिस्ट्रार, प्रशिक्षक जिजॉय पी आर, जॉय फर्नांडिस आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचाःकेरळमध्ये पोलीस स्थानकावर हल्ला…

फळदेसाई यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित

एफटीआयआयने दिव्यांगांसाठी खास कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल मंत्री सुभाष फळदेसाई यांनी त्यांचे कौतुक केले. याशिवाय, दिव्यांगांनाही फिल्म इंडस्ट्रीत संधी मिळावी यासाठी एफटीआयआयने नवनवीन उपक्रम राबवावे, अशी इच्छा फळदेसाई यांनी यावेळी व्यक्त केले. मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडला. तसेच यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेले लघुपटही दाखवण्यात आले.
हेही वाचाःराज्यात सिलिंडरमधील गॅस जातोय चोरीला; सांकवाळमधील प्रकार…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!