घरघर चलो अभियानास पार्सेकरांना भरघोस प्रतिसाद

लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Goan Varta Live | प्रतिनिधी

मांद्रे : आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मांद्रे मतदारसंघातील कार्याला दिवसेंदिवस भरघोस प्रतिसाद मिळत आहे. मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत ते मोठ्या मताधिक्याने विजयी होणार अशी चर्चा मांद्रे मतदारसंघात सध्या सुरू आहे. २७ जानेवारीला पार्सेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून घरघर चलो प्रचार अभियानास सुरवात केली.
हेही वाचाःविकासकामांमुळे मी निवडून येईन

मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्हाला पुन्हा विधानसभेत पाठवू

अपक्ष उमेदवार या नात्याने घरोघरी त्यांना प्रतिसाद मिळत आहे. मतदारसंघातील जनता आपल्या समस्या व्यक्त करताना मांद्रे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही तुम्हाला पुन्हा विधानसभेत पाठवू असे निर्भीडपणे सांगतात. मतदार संघातील वाढत्या समस्या दूर करण्यासाठी व पार्सेकर यांच्या काळात होऊ घातलेले लोकाभिमुख मेगा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अपक्ष उमेदवार पार्सेकर हा एकमेव पर्याय असा संदेश मतदारसंघात पसरत चालला आहे.
हेही वाचाः’हे’ आहेत भाजपचे अंतिम उमेदवार

दररोज ३ बूथ फिरून लोकांच्या समस्या जाणतात

निवडणूक जवळ असल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहाच्या बळावर घरघर चलो अभियानादरम्यान ते दररोज ३ बूथ फिरून लोकांच्या समस्या जाणतात, निष्ठावंत कार्यकर्त्यांनी ही अशक्यप्राय गोष्ट शक्य केली आहे, त्यांच्या प्रचाराचा वेग पाहता पार्सेकर यांचा विजय निश्चित आहे.
हेही वाचाःसात कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!