या ऐतिहासिक निर्णयामुळे लसीकरण मोहिमेला गती मिळेल

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेंचं प्रतिपादन; पंतप्रधानांच्या निर्णयाचं केलं कौतुक

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः आज संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी दोन मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यावेळी पंतप्रधानांकडून दोन मोठ्या घोषणा करण्यात आल्या. 18 वर्षांवरील सगळ्यांचं केंद्राकडून मोफत लसीकरण तसंच दिवाळीपर्यंत ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना’ वाढवण्याचा निर्णयाची पंतप्रधानांनी घोषणा केली. पंतप्रधानांनी केलेल्या या घोषणांचं मुख्यमंत्री भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेंनी कौतुक केलंय. पंतप्रधानांनी घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक असल्याचं म्हणत तानावडेंनी ट्विट केलंय.

हेही वाचाः पंतप्रधानांच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

सदानंद शेट तानावडेंचं ट्विट

सदानंद शेट तानावडे ट्विट करताना म्हणालेत, “21 जूनपासून 18+ वर्षे वयाच्या व्यक्तींचं मोफत लसीकरण जाहीर केल्याबद्दल माननीय पंतप्रधान मोदीजींचे आभार. भाजप गोवा मोदीजींच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचे स्वागत करतं. हा निर्णय ऐतिहासिक असून यामुळे जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला गती प्राप्त होईल.

कुणीच उपाशी झोपणार नाही याची घेतली काळजी

कोरोना महामारीच्या या कठीण काळात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी भारतातील ८० कोटी लोकांना मोफत रेशन उपलब्ध करून दिवाळीपर्यंत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार करून कोणतीही वंचित व्यक्ती उपाशी पोटी झोपणार नाही याची काळजी घेतील आहे. त्यांनी घेतलेला हा निर्णय मोठी आणि कौतुकास्पद आहे, असं तानावडेंनी ट्विट करत म्हटलंय.

पंतप्रधानांनी आज साधला जनतेशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज संध्याकाळी 5 वा. जनतेशी संवाद साधताना 18 वर्षावरील व्यक्तिंचं मोफत लसीकरण करणार असल्याचं जाहीर केलं आहे. लसीकरणाची सर्व जबाबदारी राज्याची नसून केंद्राची असणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे. लसीकरणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात केंद्र सरकारला फटकारलं होतं. त्यामुळे मोदी सरकारने ही जबाबदारी घेतल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येतंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!