‘मांद्रे कॉलेज ऑफ कॉमर्स’ला एकाच टप्प्यात अनुदान देणार

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी
पेडणेः ‘मांद्रे ऑफ कॉलेज’ स्थापना मागच्या दहा वर्षापूर्वी झाली होती. आजपर्यंत या कॉलेजला सरकारकडून अनुदान मिळत नसे. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर हे अनुदान देण्याची तयारी सरकारने सहा टप्प्यात केली होती. परंतु आता हे अनुदान केवळ एका टप्प्यात पूर्ण दिलं जाईल. शिवाय या वर्षापासून मेंटेनन्स अनुदान दिलं जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिनाच्या निमित्ताने ‘मांद्रे कॉलेज ऑफ कॉमर्स’ विद्यालयाचं विधिवत उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
हेही वाचाः ‘नायका’ने सेबीकडे डीआरएचपी दाखल केले
दीनदयाळ सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन
५ रोजी मांद्रे येथील दीनदयाळ सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते, मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे, मोरजी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर, मांद्रे सरपंच सुभाष आसोलकर, वकील सुरेंद्र देसाई, निर्मला खलप, पराग राव, नंदन सावंत, उच्च्माधमिक शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर, आश्विन खलप, अमित सावंत, नामदेव सावंत, चंद्रकांत साळगावकर, रमेश शेटमांद्रेकर, महेश मांद्रेकर, सुभाष वेलिंगकर, प्राचार्य अन्वेरकर, विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर वरुण सहानी आदी उपस्थित होते. प्रा. अरुण नाईक यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला परिचय करून दिला. तर नेहा पार्सेकर, अनघा आजगावकर, वरदा तळकर, नेहा पार्सेकर आणि गौरी नाईक आदींनी पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
हेही वाचाः ऑनलाईन, केवायसी फसवणुकीला बळी पडू नका
१५ ऑगस्ट २०२२ मोपा उड्डाण
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मोपा विमानतळामुळे केवळ पेडणेचाच नव्हे, तर पूर्ण राज्याच्या विकासाला हातभार लागणार असल्याचं म्हटलंय. त्याचप्रमाणे राज्याच्या चेहरा मोहरा बदलणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणालेत. १५ ऑगस्ट २०२२ रोजी पहिलं विमान मोपा विमानतळावरून उड्डाण होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
हेही वाचाः फ्लॅटमधून ८० हजारांचा मुद्देमाल लंपास
त्रीसंगम योग
विरोधी पक्षनेत्यांनी भाई खलप यांना शुभेच्छा देताना खलप यांच्याकडून राज्याची आणि देशाचीही लोकसेवा व्हावी असं म्हटलं. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, हा त्रीसंगम आहे. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि स्थानिक आमदार दयानंद सोपटे हे एकाच व्यासपीठावर येण्याचा हा योगायोग आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी ठरवलं, तर राज्याची किंवा लोकसभेची उमेदवारी खलप यांना देऊ शकतात. भाई खलप यांना उमेदवारी मिळाल्यानंतर लोक ठरवतील की ते आमदार असतील की खासदार ते.
हेही वाचाः फंडपेटी फोडल्याप्रकरणी एकाला अटक
कॉलेजसाठी मदत केलेल्यांप्रती कृतज्ञता
या पुढे जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी अशी आशा आहे. शिवाय ज्यांनी मला या कॉलेजसाठी मदत केली त्यांच्याविषयी मी सदैव कृतज्ञता बाळगेन असं खलप म्हणाले.
हेही वाचाः विहिरीत पडलेल्या तरुणाला जीवदान
सुरुवातील विरोधी पक्षनेत्यांच्या हस्ते कॉलेजच्या नामफलकाचं अनावरण झालं. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते मुख्य कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन करण्यात आलं. यावेळी मांद्रे विकास परिषद सचिव येन. जे. नाईक यांनी गौरव मूर्तींचा परिचय केला. कार्यक्रमाच्या शेवटी वकील सुरेंद्र सरदेसाई, पराग राव आणि नंदन सावंत यांचा सत्कार मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते झाला.