अमली पदार्थ प्रकरणी दोघांना सशर्त जामीन मंजूर

मुंबईच्या नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) हणजुण येथील आईसक्रिम पार्लर तथा दुकानावर २८ जून रोजी मारला होता छापा

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी: मुंबईच्या नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) २८ जून रोजी हणजुण येथील आईसक्रिम पार्लर तथा दुकानावर छापा मारून अमली पदार्थ तस्करी प्रकरणी कारवाई केली होती. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रॉक फर्नांडिस आणि त्याची पत्नीला म्हापसा येथील जिल्हा व सत्र न्यायालायने ५० हजार रुपये व इतर अटीवर सशर्त जामीन मंजूर केला आहे.

हेही वाचाः संशयित सोलोमनचे उच्च न्यायालयात आव्हान

28 जून रोजी केली होती कारवाई

एनसीबीने  २८ जून रोजी गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीवरून गोववाडे – हणजूण येथील आईसक्रिम पार्लर तथा दुकानावर बनावट ग्राहक पाठवून अमली पदार्थ तस्करी प्रकरणी कारवाई केली होती. त्यावेळी एनसीबीने दुकान मालक रॉक फर्नांडिस याला रंगेहाथ पकडून त्याच्याकडून एनसीबीने १० ग्रॅमचे ३७ एक्टेसी/ एमडीएमए टॅबलेट्स आणि ३५० ग्रॅम चरस जप्त केले होते. या प्रकरणी एनसीबीने रॉक फर्नांडिस व त्याची पत्नी आणि  चिडी ओसिटा ओकोनकवो उर्फ बेंजामिन या नायजेरीयन नागरिकाला अटक केली.

सशर्त जामीन मंजूर

अटक करण्यात आलेले सर्व संशयितांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. त्यापैकी रॉक आणि  त्याची पत्नीने म्हापसा येथील जिल्हा व सत्र न्यायालायत जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणी न्यायालयाने बुधवारी दोघांना प्रत्येकी ५० हजार रुपये व १० दिवस सकाळी १० ते दुपारी १ दरम्यान एनसीबीच्या कार्यालयात हजरी लावणे तसंच इतर अटीवर जामीन मंजूर केला आहे.  

हा व्हिडिओ पहाः RAPE | SOCIAL MEDIA | वाळपई पोलिसांकडून युवकाला अटक

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!