संकल्प आमोणकरांना कोरोनाची लागण

आपल्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचं आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः कोरोना महामारी दिवसेंदिवस भयंकर रूप घेतेय. रोजची कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि त्यामुळे होणारा लोकांचा मृत्यू, यामुळे आता भीतीदायक वातावरण निर्माण झालंय. कोरोना पॉझिटिव्ह लोकांनी रोज नवी नावं समोर येत आहेत. जीपीसीसीचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर येतेय. तसं त्यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केलंय.

हेही वाचाःपेडण्यात उठाबशा, फातोर्ड्यात लाठीचा प्रसाद

माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करावी

संकल्प आमोणकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. तशी माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे. गुरुवारी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते सध्या होम आयझोलेशनमध्ये आहेत. त्यांनी ट्विट करताना म्हटलंय, माझा कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोनाची चाचणी करावी. तसंच स्वतःची काळजी घ्यावी.

हेही वाचाः होम आयसोलेशन रूग्णांची काळजी घ्या

संकल्प आमोणकरांच्या बायकोलाही झाली होती कोरोनाची लागण

संकल्प आमोणकरांची बायको श्रद्धा आमोणकर यांचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला होता. 29 एप्रिलला त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तशी माहिती त्यांनी ट्विट करून दिली होती. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा पाठिंबा असलेल्या पॅनेलमधून श्रद्धा आमोणकर मुरगाव नगरपरिषदेच्या नगरसेवक म्हणून निवडणून आल्या होत्या.

हेही वाचाः कोरोना निवारणासाठी आता ‘आयुष’चं मनुष्यबळ !

संकल्प आमोणकरांनी पूर्वी केली होती कोरोना चाचणी

29 एप्रिलला श्रद्धा आमोणकरांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संकल्प आमोणकरांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली होती. तेव्हा त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. आता सहा दिवसांनी त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षण दिसून आल्यामुळे त्यांनी पुन्हा आपली चाचणी करून घेतली. ज्यामध्ये त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचं समोर आलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!