लसीकरणाची सुव्यवस्थित रणनीती तयार करा

रोहन खंवटेंचा सरकारला सल्ला; कोरोनाला पळवण्यासाठी लसीकरण एकमेव पर्याय

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः देशात कोरोनाने घातलेला धुमाकूळ पाहता सगळेच घाबरलेत. आरोग्य यंत्रणा तर दिवस रात्र एक करून या महामारीविरुद्ध लढण्यासाठी आपली शक्ती खर्ची घालतेय. कोरोनाला पळवून लावण्यासाठी देशात लसीकरणानेदेखील वेग पकडलाय. मात्र देशात कोरोनाबाधित सापडण्याची आकडेवारी रोज नवनवे उच्चांक गाठताना दिसतेय. पण आपल्या देशाने अजून हार मानलेली नाही. कोरोनाला पळवून लावण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याचं आता हळुहळू सगळ्यांच्या लक्षात येतंय. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी हळुहळू सगळीकडे जागृती होताना दिसतेय. पर्वरीचे आमदार रोहन खंवटेंनी कोरोना लसीकरणासाठी ट्विट करून सरकारला एक सल्ला दिलाय.

हेही वाचाः धक्कादायक! कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत 420 डॉक्टरांचा कोविडमुळे मृत्यू

रोहन खंवटेंचं ट्विट

रोहन खंवटेंनी ट्विट करताना म्हटलंय, की राज्य सरकारने राज्यात लसीकरणासाठी सुव्यवस्थित रणनीती तयार करणं आवश्यक आहे. ही रणनीती तयार करताना यामध्ये स्थानिक संस्थांना सामावून घेणं गरजेचं आहे. जेणेकरून प्रत्येकाचं कमीत कमी वेळात लसीकरण करता येईल. केवळ कोरोनावरील प्रतिबंधक लसच कोरोनाला पळवून लावण्यासाठीची प्रतिकारशक्ती गोंयकारांना देऊ शकते.

आरोग्यसेवेवर महामारीचा प्रभाव

या महामारीने संपूर्ण मानवजातीवर थेट हल्ला चढवला आहे. संपूर्ण जगभरात सार्वजनिक आरोग्यसेवांमधील पायाभूत सोयीसुविधांवर किती कमी खर्च केला जात आहे हे या काळात ठळकपणे दिसलं. आता मात्र यामध्ये बरेच बदल घडून येतील. परवडण्याजोग्या, सहज उपलब्ध होण्याजोग्या आणि मान्यताप्राप्त आरोग्यसेवांबरोबरीनेच प्रतिबंधात्मक, ज्यामधून पुढील आजारांचं निदान करता येईल अशा, व्यक्तिगत स्वरूपाच्या आरोग्यसेवा उपलब्ध झाल्या पाहिजेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!