ढवळीकर यांना धमकी प्रकरणी गोविंद गावडे निर्दोष मुक्त

११ ऑक्टोबर २००८ मधील प्रकरण

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी:  मडकईचे आमदार सुदीन ढवळीकर यांच्या कार्यालयात २००८ मध्ये अतिक्रमण करून त्यांना शिविगाळ तसंच धमकी दिल्याप्रकरणी कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांना कनिष्ठ न्यायलयाने निर्दोष मुक्त केलं होतं. या प्रकरणी राज्य सरकारने दाखल केलेला आव्हान याचिका मंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळून लावत न्यायालयाचा निवाडा कायम ठेवला आहे. याबाबतचा निवाडा खंडपीठाचे न्या. एम. एस. जवळकर यांनी गुरुवारी जारी केला आहे.

हेही वाचाः लोकांनी निवडून दिलेल्या आमदाराने विकास जनतेपर्यंत पोचवला

११ ऑक्टोबर २००८ मधील प्रकरण

या प्रकरणी मडकईचे आमदार सुदीन ढवळीकर वाहतूक मंत्री असतांना ११ ऑक्टोबर २००८ रोजी सकाळी ११.३० वाजता  त्याच्या बांदिवडे येथील कार्यालयात गावडे यांनी अतिक्रमक करून शिविगाळ केली तसंच धमकी दिल्याची तक्रार फोंडा पोलीस स्थानकात दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी गावडे याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४४८, ५०४आणि ५०६ (II) नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी याच्या विरोधात ११ मे २००९ रोजी फोंडा येथील प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

खंडपीठाने सरकारची आव्हान याचिका फेटाळून लावली

त्यानंतर न्यायालयाने ५ मार्च २०१० रोजी गावडे याच्या विरोधात आरोप निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने १५ मे २०१५ रोजी गावडे याच्या निर्दोष सुटका केली. या निवाडाला सरकारने खंडपीठात आव्हान दिलं होतं. या प्रकरणी खंडपीठाने सरकारची आव्हान याचिका फेटाळून लावली आणि कनिष्ठ न्यायालयाच्या निवाडा कायम ठेवला आहे. 

हा व्हिडिओ पहाः FENNY | SPECIAL COVER | पोस्टातर्फे काजू फेणीवर ‘स्पेशल कव्हर’ प्रकाशित

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!