सरकारी योजना आता घरबसल्या एका क्लिकवर

‘नो युवर स्कीम’ पोर्टलचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: यापुढे सरकारी योजनांसाठी गोमंतकीयांना विविध खात्यांच्या कार्यालयात हेलपाटे मारण्याची कटकट करावी लागणार नाही. कारण सर्वच सरकारी खात्यांची एकाच ठिकाणी माहिती देणारे ‘नो युवर स्किम’ पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. या पोर्टलचा शुभारंभ शुक्रवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

हेही वाचाः ट्यूशन, जिमखाना, कल्चरल शुल्क 50 टक्के माफ

पोर्टलवर योजनांची माहिती देण्याबरोबरच पात्र व्यक्तींसाठी अर्ज करण्याची सोय

या कार्यक्रमास वित्त खात्याचे सचिव पुनीतकुमार गोयल, माहिती तंत्रज्ञान खात्याच्या संचालक अंकिता आनंद, नियोजन आणि सांख्यिकी खात्याचे संचालक डॉ. वाय. दुर्गाप्रसाद, जीईएलच्या मुख्य अधिकारी रेवती कुमार, दिलेश खांडेपारकर आदी मान्यवर उपस्थित होते. माहिती तंत्रज्ञान खाते आणि गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (जेईएल) यांच्या संयुक्त विद्यमाने हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर योजनांची माहिती देण्याबरोबरच पात्र व्यक्तींसाठी अर्ज करण्याची सोयही देण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

हेही वाचाः CORONA UPDATE | राज्यातील कोविड परिस्थिती ‘जैसे थे’

तळागाळातील गोमंतकीयांसाठी ‘नो युवर स्किम’ पोर्टल

तळागाळातील गोमंतकीयांसाठी हे ‘नो युवर स्किम’ पोर्टल सुरू करण्यात आलंं आहे. या पोर्टलवर एका क्लिकवर सर्व खात्यांच्या योजना मिळणार आहेत. यापूर्वी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी व्यक्तीला संबंधित खात्याच्या कार्यालयात वारंवार जावे लागत होते. तिथे गेल्यानंतर कार्यालयातील संचालक किंवा योजनेशी निगडित अधिकारी यांची भेट घ्यावी लागायची. तिथे योजना काय आहे आणि त्यास संबंधित व्यक्ती पात्र आहे की नाही, हे जाणून घ्यावे लागत होते. त्यानंतर अर्ज कुठे मिळतील, हेही पहावे लागत होते. मात्र, यापुढे ही सर्व प्रक्रिया करण्याची गरज उरणार नाही, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

हेही वाचाः ‘या’ राज्यात आजपासून विकेंड लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू

पोर्टलवरील सुविधा

– प्रत्येक खात्याच्या योजनांची अधिसूचना, पात्रतेचे निकष, अर्ज डाऊनलोड करण्याची व्यवस्था आहे.
– घरी प्रिंटर नसल्यास पंचायत कार्यालयात जाऊन अर्ज डाऊनलोड करून घेण्याचीही सोय आहे.
– आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करण्याची सोयही पोर्टलवर उपलब्ध आहे.
– शिक्षणासाठी ‌शिष्यवृत्ती देण्याबरोबर अन्य कल्याणकारी योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

हेही वाचाः महाराष्ट्रातील 56 हजार कलाकारांना 28 कोटींची मदत

ही प्रक्रिया सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरील ‘नो युवर स्किम’ पोर्टलवरून करता येणार आहे. सध्या पोर्टलवर वीस खात्यांच्या योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अन्य खात्यांच्या योजनांचा लवकरच समावेश केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

हा व्हिडिओ पहाः Video | TRIBAL BHAVAN| १३ ऑगस्टला ट्रायबल भवनाची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!