सरकारचा गोमंतकीयांना झटका; पाणी बिलात ‘वाढ’…

पाण्याच्या बिलात ५ टक्क्यांनी वाढ

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : आधीच महागाईने उच्चांक गाठला असताना आता पाणी बिलात ५ टक्के वाढ करून गोमंतकीयांना झटका दिला आहे. ही दरवाढ १ ऑक्टोबरपासून लागू करण्यात आल्याची अधिसूचना शुक्रवारी जारी केली आहे.
हेही वाचाःPhoto Story | Navratri Special Day – 6 | राखाडी रंग आयुष्यात योग्य दिशा दाखवतो आणि जीवनातील अंधार दूर करतो…

१ ऑक्टोबरपासूनच ५ टक्के दरवाढ करण्यात आली

प्रत्येक आर्थिक वर्षात पाणी बिलात ५ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वीच घेतला होता. मे २०२० मध्ये तशी अधिसूचनाही जारी करण्यात आली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी आजपर्यंत करण्यात आली नव्हती. यंदाही एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. आता त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या अनुषंगाने १ ऑक्टोबरपासूनच ५ टक्के दरवाढ करण्यात आली आहे, असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचाःPhoto Story | नवरात्रोत्सवातील अनोखं देवदर्शन…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!