गोंयकारांनो जागे व्हा – मनोज परब

माजोर्डा येथे रिव्होल्युशनरी गोवन्सच्या सभेला लोकांची मोठी उपस्थिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगावः गोवेकर कोण याची व्याख्याच अद्याप निश्चित झालेली नाही. याला जबाबदार केवळ आम्हीच आहोत. गोवेकरांनो जागे व्हा, असं आवाहन रिव्होल्यूशनरी गोवन्सचे मनोज परब यांनी केलं. रविवारी माजोर्डा येथे रिव्होल्युशनरी गोवन्सची कोपरा सभा झाली. या सभेला मोठ्या प्रमाणात लोकांनी उपस्थिती लावली होती.

या भीतीने हे बिल मांडलं गेलं नाही

यावेळी परब म्हणाले, गोवा मुक्त होऊन साठ वर्षं पूर्ण झाली. केंद्र सरकारने ३०० कोटी दिलेत. आता गोंयकारांनी जागृत झालं पाहिजे. आम्ही पोगो बिल चाळीसही आमदारांना सादर केलं होतं. मात्र, ते विधानसभेत मांडलं गेलं नाही. जर हे बिल संमत झालं तर परप्रांतीय मतदारांच्या मतांवर पाणी सोडावं लागेल. या भीतीने हे बिल मांडलं गेलं नाही. उलट आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरन्स यांनी हे बिल अघटनात्मक असल्याचं म्हटलं. त्यांच्या कुडतरीत चार झोपडपट्ट्या उभ्या राहिल्यात, असंही परब यावेळी म्हणाले.

हेही वाचाः मालवणात नौकेवर हल्ल्याचा प्रयत्न

या मातीतील लोकांवर अन्याय होता कामा नये

गोवेकरांना महत्त्व नाही. आम्ही प्रसिद्धीच्या हव्यासापोटी कार्यरत नाही. सीझेडएमपी जनसुनावणीवेळीही रिव्होल्युशनरी गोवन्सवाले होते. दुहेरी मार्ग आणि कोळसा वाहतुकीविरोधातही आम्ही उतरलो आहे. गोवेकरांना त्रास होता कामा नये. या मातीतील लोकांवर अन्याय होता कामा नये हाच आमचा उदात्त हेतू आहे, असं ते म्हणाले.

प्रशासकीय कामासाठी बाहेरची मंडळी आणली

रिव्होल्युशनरी गोवन्सचे दक्षिण गोवा निमंत्रक तेवातानियो कॉस्ता यांनी पोगो बिल नेमकं काय होतं, हे सांगितलं. गोवा मुक्तीनंतर भाऊसाहेब बांदोडकर यांनी प्रशासकीय कामासाठी बाहेरची मंडळी आणली. त्या लोकांनी येथील लोकांच्या नावात अनेक चुका केल्या. आता आम्हाला त्याची किंमत मोजावी लागत आहे. जनमत कौलावेळी गोवेकरांनी गोव्याचं अस्तित्व कायम राहावं यासाठी लढा दिला. गोव्याची अस्मिता राखून ठेवली.

हेही वाचाः नोटाला जास्त मतं मिळाली, तर निवडणूक पुन्हा घ्यावी- सुप्रीम कोर्ट

रिव्होल्युशनरी गोवन्स गोव्याची राखणदार

फा. मार्टिन दोरादो यांनी रिव्होल्युशनरी गोवन्स ही संस्था गोव्याची राखणदार असल्याचं सांगितलं. गोव्याची अस्मिता कायम ठेवण्यासाठी ते वावरत आहेत. आम्हाला गोवा राखून ठेवायचा आहे. आम्ही गोवेकर आहोत, असं ते म्हणाले.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप विरुद्ध रिव्होल्युशनरी गोवन्स यांच्यातच खरी लढत

गोव्याच्या हिताच्या गोष्टी करणारे पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत १२ उमेदवार ठेवू असं सांगतात. मात्र, रिव्होल्युशनरी गोवन्स सर्व चाळीसही मतदारसंघांत उमेदवार उभे करणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध रिव्होल्युशनरी गोवन्स यांच्यातच लढत होईल. आगामी सरकार आमचंच असेल, असं परब म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!