गोवन वार्ता LIVEच्या बातमीचा दणका!

कार्ला गावची मंत्र्यांकडून दखल

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः बातमी गोवन वार्ता लाईव्हच्या दणदणीत इम्पॅक्टची.. ‘गोवन वार्ता लाईव्ह’चे सिनिअर रिपोर्टर विश्वनाथ नेने तसंच व्हिडिओ जर्नलिस्ट रूपेश राऊत यांनी सांगे तालुक्यातील कार्ला गावाला भेट देऊन तेथील भयानक वास्तव गोंयकारांसमोर आणलं. गोवा मुक्तीच्या 60 वर्षांनंतरही हा गाव मुलभूत सोयी-सुविधांपासून कोसो दूर आहे. या स्पेशल रिपोर्टची दखल घेत आदीवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे या गावाला गुरुवारी भेट देणार असल्याचं समजतंय.

हेही वाचाः CORONA UPDATE | कोविड चाचण्यांचा आकडा वाढला

सांगेतील कार्ला गाव समस्यांच्या गर्ततेत

गोवा मुक्तीच्या ६० वर्षांनंतरही देशातील आधुनिक राज्य म्हणवणाऱ्या गोव्यात आजही अनेक गावं जीवनाच्या प्राथमिक गरजांपासून वंचीत आहेत. अशाच गावांमध्ये येतो सांगे तालुक्यातील कावरे पिर्ला पंचायत क्षेत्रातील कार्ला हा गाव. सांगे मतदारसंघातील डोंगर माथ्यावर अनेक गाव वसलेत. त्यातलाच एक किर्ला. या गावात रस्ता आहे पण त्याची अतिशय बिकट अवस्था आहे. दळणवळणाची कोणतीही सुविधा नसल्याने आरोग्य, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेलं आहे. एवढंच नव्हे तर पाणी, आरोग्याच्या मुलभूत गरजांपासून आजही कोसोदूर आहे. या गावात रस्ते, शासकीय योजना केवळ कागदावरच आहेत. या गावातील रस्त्यावरून दुचाकीसुद्धा नेली जाऊ शकत नाही. या गावात साधारण 25 ते 30 घरं आहेत. थोडक्यातच काय हे गोवा दुर्लक्षित आहे.

हेही वाचाः धक्कादायक : गोव्यानजीक सिंधुदुर्गात कोविड डेल्टा प्लस स्टेनचा रूग्ण

मंत्री गोविंद गावडे कार्लाला देणार भेट

कार्ला गावा आजही दारिद्र्यात जगतंय. ‘गोवन वार्ता लाईव्ह’ने या गावावर स्पेशल रिपोर्ट करून मंत्र्यांना या गावची दखल घ्यायला भाग पाडलंय. येत्या गुरुवारी जिल्हाधिकारी, मामलेदार, तलाठी, पीडब्लूडी अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह या कार्ला गावाला भेट देणार असल्याचं आदीवासी कल्याण मंत्री गोविंद गावडेंनी सांगितलंय. या गावातील लोकांच्या समस्या लवकरच सुटाव्यात अशी आशा आहे.

हेही वाचाः रिव्हॉल्यूशनरी गोवन्स हरित गोव्यासाठी सज्ज

पाहा हा खास रिपोर्ट –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!