गोवा : नोकऱ्यांसाठी अर्ज केलेल्या हजारो युवकांसाठी खूशखबर!…

निवडणूक आचारसंहितेपूर्वी जाहिरात दिलेली पदे भरण्यास मान्यता

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : निवडणूक आचारसंहितेमुळे ही पदे भरण्याची प्रक्रिया सरकारला थांबवावी लागली. ८ जानेवारी २०२२ रोजी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. गोव्यात १४ फेब्रुवारीला मतदान झाले आणि मार्चला मतमोजणी झाली. निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सरकार सत्तेवर आले. डॉ. प्रमोद सावंत पुन्हा मुख्यमंत्री झाले. आचारसंहितेमुळे भरती प्रक्रिया रखडल्याने हजारो अर्जदारांची निराशा झाली होती. आता नोकरी मिळणे अशक्य आहे. पुन्हा जाहिरात आल्यानंतर त्यांना पुन्हा अर्ज करावा लागेल आणि सर्व औपचारिकता पुन्हा करावी लागेल, अशी चिंता त्यांना सतावत होती.
हेही वाचाःकन्नडिगांना निवडणूक लढवण्यास आरजीचा विरोध, ‘हे’ आहे कारण…

हजारो तरुणांना मोठा दिलासा

आता या सर्व अर्जदारांना अध्यादेशामुळे मोठा दिलासा मिळाला. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सरकारी नोकऱ्यांसाठी पदांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत, ती पदे एका वर्षापर्यंत भरण्याची मोकळीक सरकारला मिळाली आहे. ही पदे भरण्यासाठी राज्यपालांनी ११ मे रोजी एक दुरुस्ती अध्यादेश जारी केला आहे. त्यामुळे ११ मे २०२३ पर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या अध्यादेशामुळे अर्ज केलेल्या हजारो तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचाःपरप्रांतिय महिलेचा गोव्यात खून ; मात्र पती…

अध्यादेशातील कलमे

भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्या खात्यांनी ११ मे २०२३ पूर्वी परीक्षा किंवा मुलाखती घेण्यास हरकत नाही, असे अध्यादेशात म्हटले आहे. या अध्यादेशाने ‘गोवा रोजगार आयोग’ कायद्याच्या कलम ७ मध्ये सुधारणा केली आहे. ८ जानेवारी २०२२ पूर्वी प्रकाशित झालेल्या नोकरीच्या जाहिरातींसाठी, परीक्षा दिल्यानंतर एका वर्षाच्या आत त्या भरण्यास हरकत नाही. या अध्यादेशात या कलमांचा समावेश करण्यात आला आहे. विधानसभेचे अधिवेशन सुरू नसल्याने हा अध्यादेश जारी करण्यात आला.
हेही वाचाःगोवा प्रशासकीय लवादाचे कर्मचारी ‘अडचणीत’…

प्रसिद्ध झालेल्या पदांची स्थिती…

  • पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, लाईन हेल्पर आणि आरोग्य विभागातील पदांसाठी ८ जानेवारी २०२२ जाहिराती देण्यात आल्या होत्या. जाहिराती आल्यानंतर हजारो तरुणांनी नोकरीसाठी अर्ज केले.
  • लाइन हेल्परच्या २५५ जागांसाठीही परीक्षा घेण्यात आली होती. लाइन हेल्परसाठी २,६७८ जणांनी अर्ज केले होते. लेखी परीक्षेचा निकालही जाहीर झाला. मात्र, निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने ही पदे भरण्यात आली नाहीत.
  • पोलीस खात्यातील पीएसआय, पीसी आणि इतरांची २००५ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कॉन्स्टेबल यांच्यासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. या पदांसाठी हजारो तरुणांनी अर्ज केले होते.
  • आरोग्य विभाग, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर विभागातील काही पदांसाठी जाहिराती देण्यात आल्या होत्या.
    हेही वाचाः१२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, पर्यटक म्हणून…
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!