खूशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना २८ टक्के डीए लागू

केंद्राच्या आदेशानंतर गोवा सरकारचा निर्णय

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. नुकताच केंद्र सरकारनं केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीए देण्यासोबतच त्यात वाढ करण्याचाही निर्णय घेतला होता. त्यानंतर आता राज्य सरकारनंही केंद्र सरकारच्या आदेशानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर दिली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही आता २८ टक्के डीए लागू करण्यात आला आहे. यासंबंधीचं परिपत्रकही जारी करण्यात आलंय. त्यामुळे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातही घसघशीत वाढ होण्याची शक्यताय.

ऑगस्ट महिन्यापासून वाढीव डीए अर्थात महागाई भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे. दरम्यान, कोरोना महामारीमुळे केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या डीएचे तीन हप्ते अद्याप मिळालेले नव्हते. कोरोना महामारीमुळे सरकारने डीएवर बंदी घातली होती. त्याचप्रमाणे पेन्शनधारकांच्या डीआरचे हप्तेही दिले गेले नव्हते. १ जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 पर्यंत कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे डीए आणि डीआर प्रलंबित होते. अशातच आता मोदी सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांना १४ जुलै रोजी दिलासा दिला होता.

हेही वाचा : वाढलेल्या डीएमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार, हे जाणून घ्या

डीएमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेत सरकारनं असं म्हटलंय, की, वाढीव डीए जुलै 2021 पासून लागू होईल आणि मागील थकबाकींवर लागू होणार नाही. म्हणजेच 14 जुलै महागाई भत्ता 28 टक्के दराने देण्यात येईल. आता केंद्राप्रमाणेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही २८ टक्क्यांप्रमाणे महागाई भत्ता देण्यात येणार असल्यानं दिलासा व्यक्त केला जातोय.

हेही वाचा : कामाची बातमी! 5, 10 आणि 100च्या नोटांबाबत लवकरच मोठा निर्णय

salary

महागाई भत्ता म्हणजे काय?

महागाई भत्ता हा पगाराचा एक भाग आहे. कर्मचार्‍याच्या मूलभूत पगाराची ती निश्चित टक्केवारी आहे. देशातील महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी सरकार आपल्या कर्मचार्‍यांना महागाई भत्ता देते. ते वेळोवेळी वाढविले जाते. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनाही त्याचा लाभ मिळतो.

हेही वाचा : TATAची NEXON EV एकदा चार्ज केल्यावर खरंच 312 Km चालते?

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!