गोंयकारांना सप्टेंबरमधील वाढीव बिलं मिळाल्यावर मुख्यमंत्र्यांचा पाणी जुमला उघड होईल

'आप'चा भाजप सरकारला टोला

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या बहुचर्चित मोफत पाणी योजनेसाठी १ सप्टेंबरकडे डोळे लावून बसलेल्या गोंयकारांना धक्का बसला. कारण ती योजना म्हणजे आणखीन एक जुमला ठरली आहे. कारण सरासरी गोंयकारांच्या पाणी दरात जवळपास ८० टक्याने वाढ झाली. ‘आप’च्या योजनांची नक्कल करण्यात पटाईत असलेल्या सावंत सरकारला त्यांची अंमलबजावणी कशी करावी याची कल्पना नाही, असा टोला ‘आप’ने लगावलाय.

हेही वाचाः PF खात्यातील रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर भरावा लागणार कर; सरकारचे नवीन नियम

सावंत सरकारला माहीत नाही की सरासरी गोंयकार कुटुंब दरमहा १६ हजार लिटरपेक्षा जास्त पाणी वापरतं. खरंतर बहुतेक गोंयकारांना आता दुसऱ्या सर्वोच्च स्लॅबमध्ये हलवण्यात आलं आहे. सर्वांत वाईट म्हणजे मोफत पाणी योजना फक्त काम करणाऱ्या मीटरवर लागू होईल. सदोष किंवा अकार्यक्षम मीटर असलेल्यांना १६ हजार लिटर पर्यंत संपूर्ण रक्कम ३.५ रुपये प्रति युनिटच्या नवीन दराने भरावी लागेल. पूर्वी त्यासाठी २.५ रुपये प्रति युनिट असा दर होता.

गोव्यातील घरं किमान १००० लिटर पाणी वापरतात

सार्वजनिक बांधकाम अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्यातील घरं किमान १००० लिटर पाणी वापरतं, जे दरमहा 30 घनमीटर असतं आणि अशा प्रकारे ५० ते ६० टक्के ग्राहक १५ रुपये प्रति घनमीटरच्या टप्प्यात येतात, जो दुसऱ्या क्रमांकाचा स्लॅब आहे. थोडक्यात जेथे खालच्या टप्प्यातील ग्राहक फक्त थोडी रक्कम वाचवत आहेत तिथे सरासरी गोवेकर सावंत यांच्या अनुदानाचे औचित्य सिद्ध करण्यासाठी दुप्पट पैसे देतील. जे बहुतेक गोवेकरांना काहीही उपयोगी नाही.

हेही वाचाः 40 टक्के भारतीयांचं आयुष्य 9 वर्षांनी कमी होऊ शकतं; महाराष्ट्रासाठी परिस्थिती चिंताजनक

ही घोषणा केवळ प्रसिद्धी हेतूंसाठी

घरगुती ग्राहकांना सर्वात जास्त फटका बसेल कारण जे १६,००१ लीटर वापरतील. म्हणजेच दररोज ५३३ लिटरपेक्षा जास्त वापरतात त्यांना आता त्यांच्या जुन्या बिलाच्या रकमेच्या जवळपास दुप्पट पैसे द्यावे लागतील. सावंत सरकारने विनामूल्य पाण्याच्या वापरासाठी वरच्या मर्यादेची गणना करण्यामागील आपला तर्क देखील सांगितला केला नाही. ही घोषणा केवळ प्रसिद्धी हेतूंसाठी केलेली घोषणा आहे. जर सावंत सरकार काही गोवेकरांना मोफत पाणी देऊ शकत असेल तर त्यांना ते सर्व गोवेकरांना देण्यापासून काय रोखत आहे? असा सवाल ‘आप’ने उपस्थित केलाय.

हेही वाचाः राज्यात भाजप सरकारचे दिवस भरले; २०२२ मध्ये काँग्रेस सरकार स्थापणारः कामत

गोंयकारांना लुटण्याचा एक नवीन मार्ग

हे स्पष्ट आहे की सावंत सरकारने जगासमोर मोठे दावे करताना गोंयकारांना लुटण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे. जेव्हा ‘आप’ सत्तेत येईल तेव्हा आम्ही केवळ गोंयकारांना मोफत पाणी देणार नाही, तर आम्ही आमच्या योजनेतून प्रत्येक गोवेनकरांना पाणीपुरवठा होईल याची खात्री करू. आम्ही अवाजवी किंमतींसह जुमला करणार नाही. दिल्लीमध्ये ‘आप’ सरकार ९० टक्के पेक्षा जास्त दिल्लीकरांना त्यांच्या योजनांमधून फायदा मिळेल याची खात्री करण्यासाठी वापराच्या पद्धतींचा अभ्यास करून प्रत्येक कुटुंबाला २० हजार लिटर पाणी देते. शिवाय दिल्ली जल बोर्डाने ९० टक्के पेक्षा जास्त दिल्लीला पाईपद्वारे पाणी मिळण्याची खात्री करण्यासाठी काम केलं आहे जे लवकरच १०० टक्के होणार आहे, असं ‘आप’ने म्हटलंय.

हेही वाचाः तुमच्या मोबाईल सिम कार्डशी संबंधित नियम बदलले! सरकारने दिली आता ही माहिती

कोरडे नळ कसे संपवतील या सर्व गोष्टींबाबत सावंत गप्प

योजना आणताना हे महत्त्वाचं आहे की सरकार जास्तीत जास्त लोकांना कशी मदत करतं याचा अभ्यास करणं. गोंयकार सरासरी किती लिटर वापरतात, सदोष मीटर दुरुस्त करण्याची त्यांची योजना, प्रत्येक गोव्याच्या घरापर्यंत पाईपयुक्त पाणी पोहोचण्याची त्यांची योजना आणि ते टँकरवरील अवलंबित्व कसे संपवतील आणि गोव्याला विशेषतः ग्रामीण गोव्याला त्रास देणारे कोरडे नळ कसे संपवतील या सर्व गोष्टींबाबत सावंत गप्प आहेत, असं ‘आप’ने म्हटलंय.

हेही वाचाः आठ महिन्याच्या चिमुरडीला HIV ची लागण; संक्रमित रक्त दिल्याची घटना

सावंत सरकारने घाबरून मोफत पाणी योजनेची घोषणा करण्यापूर्वी काहीही अभ्यास केला नाही

याबाबत ‘आप’ नेत्या प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या, सावंत सरकारने घाबरून या योजनेची घोषणा करण्यापूर्वी काहीही अभ्यास केला नाही. त्यांनी त्याऐवजी दर जाहीर केले, ज्यामुळे गोंयकारांना जास्त बिलं भरावी लागतील. यामुळे गोंयकारांवर ओझं वाढेल. फक्त अनुदानाची घोषणा केल्यानं बहुसंख्य गोंयकारांना जास्त बिलं येणार आहेत. यामुळे त्यांना दिलासा मिळणार नाही.

हा व्हिडिओ पहाः Breaking | Politics | Congress | काँग्रेसचे निवडणूक निरीक्षक शुक्रवारपासून पुन्हा गोव्यात


ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!