गोसासेच्या नूतन कार्यकारिणीची निवड

गोमंतक साहित्य सेवक मंडळाची रविवारी नूतन कार्यकारी मंडळाची निवडणूक पार पडली.

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गोमंतक साहित्य सेवक मंडळाची रविवारी नूतन कार्यकारी मंडळाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत मावळते अध्यक्ष रमेश वंसकर हे सलग दुसऱ्यावेळी अध्यक्षपदी निवडून आले आहेत. त्यांना ९८ मतं मिळाली. दुसरे उमेदवार सुरेश स. नाईक यांना ४२ मते पडली.

उपाध्यक्षपदी विठ्ठल गावस

उपाध्यक्षपदी विठ्ठल गावस निवडून आले आहेत. त्यांना ५५ मते पडली तर अन्य दोन उमेदवार शंभू भाऊ बांदेकर (भूतपूर्व उपाध्यक्ष ) यांना ३३ तर धर्मा चोडणकर यांना ४२ मते पडली. कार्यवाहपदाच्या दोन जागांवर दोन्ही विद्यमान कार्यवाह सुहास बेळेकर व चित्रा क्षीरसागर भरघोस मतांनी निवडून आले. बेळेकर यांना १०६ तर क्षीरसागर यांना १०५ मते मिळाली. तिसरे उमेदवार सुदेश आर्लेकर यांना ३७ मते पडली.

कोषाध्यक्षपदी राजमोहन शेट्ये

कोषाध्यक्षपदी राजमोहन शेट्ये (९१ ) हे निवडून आले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी प्रमोद कारापूरकर यांना ३९ मते पडली.

सहा कार्यकारी सदस्य

सहा कार्यकारी सदस्यपदासाठी १३ उमेदवार होते. पैकी दशरथ परब (९८), विनायक नाईक (८३), प्रकाश तळवडेकर (८३ ), गुरुनाथ नाईक (८१), लीना पेडणेकर (७२) आणि हेमंत खांडेपारकर (६८) हे विजयी झाले.

दरम्यान, रमेश वंसकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंडळाच्या आमसभेत, गेल्या ३ वर्षांचा जमा खर्चाचा हिशेब सादर न केल्याबद्दल सुरेश नाईक यांनी आक्षेप घेतला. त्यावर गरमागरम चर्चा झाली. ऑडिट रिपोर्ट न मिळाल्याने हिशेब सादर करता न विनायक नाईक यांनी दिलगिरी व्यक्त केली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!