ओबीसी समाजातील 27 मंत्र्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान

गोमंतक बहुजन समाजाकडून पंतप्रधानांच्या निर्णयाचं कौतुक

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः मोदी मंत्रिमंडळाचा बुधवारी 7 जुलै रोजी विस्तार झाला. मंत्रिमंडळात अनेक बदल करण्यात आले आहेत. दलित तसंच मागासवर्गीयांना अधिक प्रतिनिधित्व देत त्यांना पुढे आणण्यासाठी मोदी सरकारने मंत्रीमंडळाच्या विस्तारात त्यांना महत्त्वाचं स्थान दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या या निर्णयावर गोमंतक बहुजन समाजाकडून आनंद व्यक्त करण्यात आलाय.

हेही वाचाः देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्प घट, कोरोनाबळी मात्र वाढले

मोदींच्या नेतृत्वाखाली ओबीसी समुदायाला मिळालं प्रतिनिधीत्व

मोदींच्या मंत्रिमंडळात नव्याने सामील झालेल्या ४३ सदस्यांमध्ये ओबीसी समाजातील २७ मंत्र्यांना शपथ दिल्याबद्दल गोमंतक बहुजन महासंघाने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळात ओबीसी समुदायाला इतकं मोठं प्रतिनिधित्व मिळालं आहे.

हेही वाचाः RBI कडून 14 बँकांना कोट्यवधींचा दंड

ओबीसी समुदायाच्या हिताला चालना देण्यासाठी मोदींचे प्रयत्न कौतुकास्पद

सर्व स्तरांमध्ये ओबीसी समुदायाच्या हिताला चालना देण्यासाठी आणि सरकार आणि भारतीय जनता पक्षाला ओबीसी समुदायाच्या अखंड पाठिंब्याचं आश्वासन देण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या या पुढाकारामुळे महासंघ अत्यंत खुश असल्याचं गोमंतक बहुजन महासंघचे अध्यक्ष अनिल होबळे यांनी म्हटलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!