आशियाई ब्लिट्झ बुद्धिबळमध्ये गोमंतकीय दिव्याची सुवर्ण कामगिरी…

दिव्याच्या उज्ज्वल कारकिर्दीसाठी ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव : १६व्या आशियाई ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी २ सुवर्णपदके आणि श्रीलंकेत झालेल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत १ कांस्य पदक आणि १ रौप्य पदक जिंकल्याबद्दल मडगाव येथील दिया दिगंबर सावळ हिचे अभिनंदन केले जात आहे. ‌तिच्या या यशाबद्दल प्रशिक्षक आणि पालकांना धन्यवाद देण्यात येत आहेत. तसेच सुवर्णपदक विजेत्या दिव्याच्या उज्ज्वल कारकिर्दीसाठी गोव्यातील विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधींसह गोमंतकातील बुद्धिबळ चाहत्यांनी तिला ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!