सोनसाखळी चोरी: माल विकत घेणाऱ्या सोनाराला अटक

संशयितांना सहा दिवसांची पोलीस कोठडी

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव: मायणा कुडतरी आणि कुंकळ्ळी पोलिसांनी एकत्रितरीत्या केलेल्या कारवाईत गोव्याच्या विविध भागांत सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या प्रकरणी संशयित अजय उर्फ रुनी व महम्मद सर्फराज यांच्यासह चेन विकत घेणारा संशयित लीलेश लोटलीकर (रा. बोर्डा, मडगाव) याला अटक केली आहे. सर्वांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचाः गोंयकारपण नेस्तनाबूत होण्यापासून वाचवा

मायणा कुडतरी पोलिसांची कारवाई

मायणा कुडतरी पोलीस निरीक्षक शिवराम वायंगणकर व कुंकळ्ळी पोलीस निरीक्षक थेरन डिकॉस्टा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणात एक केटीएम दुचाकी जप्त करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून येऊन सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला होता.

सोनसाखळ्या विकत घेतलेल्या सोनारालाही अटक

या प्रकरणी बेळगाव येथील अजय उर्फ रुनी भोगुलकर व दवर्ली येथील महम्मद सर्फराज यांना मायना कुडतरी व कुंकळ्ळी पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली होती. चोरी केलेल्या सोनसाखळी बोर्डा येथील सोनार लीलेश लोटलीकर हा विकत घेत असल्याची माहिती संशयितांकडून प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी संशयित लीलेश यालाही अटक केली आहे.

हेही वाचाः बदली रोखण्यासाठी जॅकीस यांची धडपड

संशयितांना सहा दिवसांची पोलिस कोठडी

या प्रकरणी तिन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असता सर्वांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी मायणा कुडतरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

हा व्हिडिओ पहाः Crime | Follow Up | Major Development | सिद्धी नाईकच्या मृत्यूप्रकरणी महत्त्वाची अपडेट

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!