राज्यात लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर पर्यटन पुन्हा सुरू करावं

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकरांचा सरकारला सल्ला

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्याच्या किनारपट्टी भागातील लोकसंख्येचं कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाल्यानंतरच राज्यातील पर्यटन पुन्हा सुरू करावं, असं गोव्याचे उपमुख्यमंत्री तथा पर्यटनमंत्री मनोहर (बाबू) आजगावकर यांनी मंगळवारी सांगितलं.

हेही वाचाः 67 मृत्यूंची माहिती लपवलेल्या प्रकाराची चौकशी करा

कोविडवरील लस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा

गोवा सरकारने हॉटेल्सचं कामकाज चालू दिलं असलं, तरी कोविड-19 महामारी शिगेला पोहोचण्यास सुरुवात झाल्यापासून राज्यात सुरू असलेल्या संचारबंदीमुळे रेस्टॉरंट्स आणि पर्यटनाशी संबंधित इतर उपक्रम बंद करण्यात आले आहेत. ज्या पर्यटकांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेत त्यांनाच राज्यात येण्याची परवानगी द्यावी, असं आजगावकर म्हणालेत.

हेही वाचाः सुनील छेत्रीने मोडला लिओनेल मेस्सीचा रेकॉर्ड

पर्यटन राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा

राज्याचा पर्यटन उद्योग आम्ही कायमचा बंद ठेवू शकत नाही. कारण हा आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा आहे. राज्यातील संपूर्ण लोकसंख्येचं दोन्ही डोससह ‘100 टक्के’ लसीकरण झाल्यानंतरच पर्यटन उद्योग आपले सर्व उपक्रम पुन्हा सुरू करू शकतो, असंही आजगावकर म्हणाले.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या बाबतीत केंद्रांच्या निर्णयावर अवलंबून

कोविड-19 लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या पर्यटकांनाच राज्यात प्रवेश देऊन सगळी काळजी घेत पर्यटन खुलं केलं पाहिजे. राज्यात पर्यटन पूर्णपणे सुरू झाल्यानंतरच राज्य मीडिया कॅम्पेनिंग सुरू करेल, आणि देशातील पर्यटकांना राज्यात आमंत्रित करेल. या उद्योगाला त्याचं भूतकाळातील वैभव परत मिळवावं लागेल, ज्याचं कोविड महामारीमुळे नुकसान झालंय. आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या बाबतीत उड्डाणे पुन्हा सुरू करण्याच्या केंद्राच्या निर्णयावर राज्याला अवलंबून रहावं लागेल, असं आजगावकर म्हणाले.

हेही वाचाः समाजमाध्यमावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या ‘त्या’ संशयिताला अटक

जीटीडीसी तोट्यात

दरम्यान, गोवा पर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी) आपलं नुकसान कमी करण्यासाठी पर्यटन उपक्रम लवकर पुन्हा सुरू करण्याची आशा बाळगून आहे. जीटीडीसी राज्यात 13 हॉटेल्सचा कारभार सांभाळते, ज्यातील बरीचशी किनारपट्टी भागात आहेत. जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाईंनी दिलेल्या माहितीनुसार गेली 2 वर्षं जीटीडीसी तोट्यात चाललीये, असंही आजगावकरांनी बोलताना नमूद केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!