गोव्याच्या पहिल्या लक्झरी बीच रिसॉर्टचा गोवा घटकराज्य दिनानिमित्त सत्कार…

राज्यातील पर्यटन उद्योगाच्या विकासासाठी योगदान देणार : व्हिन्सेंट रामोस

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : ३५ व्या गोवा घटकराज्य दिनानिमित्त, ‘ताज फोर्ट आग्वाद रिसॉर्ट अँड स्पा’ला राज्यातील पर्यटन क्षेत्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल माहिती आणि प्रसिद्धी विभागातर्फे सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम डोना पावला येथील राज भवन येथे संपन्न झाला. ‘ताज’ हा भारतातील सर्व क्षेत्रांतील सर्वात एक मजबूत ब्रँड आहे. भारतीय हॉटेल्स कंपनी लिमिटेड (आयएचसीएल) च्या या ब्रँडला ११८ वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा वारसा असून तो भारतीय आदरातिथ्याचे वैशिष्ट्य दर्शवितो.

मान्यताप्राप्त रिसॉर्टच्या प्रमुख कामगिरीमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे

गोव्यातील पर्यटनासाठी बेंचमार्क मानके साध्य करण्यासाठी राज्य प्राधिकरणांमध्ये सक्रिय सहभाग, वर्षानुवर्षे परिवर्तनशील वाढ स्थापित करणे ज्यामुळे अधिक नफा आणि बाजार नेतृत्व, शाश्वत पर्यटन पद्धतींचा वापर करून वसुंधरेची जबाबदारी तसेच काळजी घेण्याची संस्कृती जोपासणे, जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि स्थानिक समुदायांना परत देण्याच्या दृष्टीने सर्वसमावेशक आणि सहयोगी दृष्टीकोन बाळगणे.

राज्यातील पर्यटन उद्योगाच्या विकासासाठी योगदान देणार

या प्रसंगी बोलताना आयएचसीएलचे गोवा वरिष्ठ उपाध्यक्ष व्हिन्सेंट रामोस म्हणाले की, “राज्याच्या सेवेची भूमिका बजावल्याबद्दल आम्हाला अभिमान आणि नम्र वाटत आहे. ताज फोर्ट आग्वाद रिसॉर्ट अँड स्पा सुरू केल्यापासून आयएचसीएल म्हणजे गोवा असे समीकरण झाले आहे .आम्ही यापुढेही राज्यातील पर्यटन उद्योगाच्या विकासासाठी योगदान देत राहू. नुकत्याच जाहीर केलेल्या ‘आहवान २०२५’ या आयएचसीएलच्या आगामी वर्षांमध्ये फायदेशीर वाढ करण्याच्या त्रि-आयामी धोरणांनुसार, स्थानिक समुदाय आमच्या उपस्थितीच्या फायद्यांमध्ये जास्तीत जास्त स्थानिक रोजगार आणि संभाव्य व्यावसायिक संधींसाठी नवीन मार्ग सामायिक करतील.”

ताज फोर्ट आग्वाद रिसॉर्ट देशातील पहिले लक्झरी बीच रिसॉर्ट

ताज फोर्ट आग्वाद रिसॉर्ट अँड स्पा हे १९७४ मध्ये भारताच्या स्वर्णीय राज्याचे जगभरात स्वागत करणारे देशातील पहिले लक्झरी बीच रिसॉर्ट होते. १९८३ मध्ये कॉमनवेल्थ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट मीटिंगसाठी हे आयोजक हॉटेल होते. अशाप्रकारे आयएचसीएल, आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर गोव्याला मनोरंजनाचे ठिकाण म्हणून स्थापित करण्यात अग्रेसर ठरले. २१ अद्वितीय स्थळे आणि ब्रँड्सच्या विस्तृत स्पेक्ट्रममध्ये १५०० हून अधिक खोल्यांसह, आयएचसीएल गोव्यातील पर्यटनाच्या बदलत्या लँडस्केपची व्याख्या ठरत आहे. आयएचसीएल पर्यटन क्षेत्रातील सर्वात मोठा हॉस्पिटॅलिटी ऑपरेटर आणि नेता म्हणून करत आहे.

ब्रँड फायनान्स इंडिया १०० अहवाल २०२२

इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (आयएचसीएल) बाबत

इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (आयएचसीएल) आणि त्‍याच्‍या उपकंपनी ब्रँड व व्‍यवसायांचा एक समूह एकत्र आहेत. ते भारतीय आदरातिथ्‍य सोबत जागतिक दर्जाची सेवा देतात. यामध्ये आयकॉनिक हॉस्पिटॅलिटीचे वैशिष्ट्य असणारे ‘ताज’ , ‘सेलेक्यूशन्स’ नामक हॉटेल्सचा नामांकित संग्रह, अत्याधुनिक अपस्केल हॉटेल्स ‘विवांता’ आणि ‘जिंजर’ यांचा समावेश आहे, जे लक्स विभागात क्रांती घडवत आहे.

आयएचसीएलकडे २०० हॉटेल्सचा पोर्टफोलिओ आहे

टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांनी स्थापन केलेल्या, कंपनीने १९०३ मध्ये मुंबईत आपले पहिले हॉटेल – ‘ताजमहाल पॅलेस’ उघडले. आयएचसीएलकडे २०० हॉटेल्सचा पोर्टफोलिओ आहे . हे सर्व १०० स्थानांमध्ये विभागले आहे. यात ४ खंड, १२ देश आणि त्याहून अधिक जागतिक स्तरावर ४२ विकासाधीन स्थानांचा समावेश आहे. इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (आयएचसीएल) ही बाजार भांडवलानुसार दक्षिण आशियातील सर्वात मोठी हॉस्पिटॅलिटी कंपनी आहे. हे प्रामुख्याने बीएसई ( BSE) आणि एनएसई ( NSE) वर सूचीबद्ध( लीस्टेड )आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!