गोव्याहून मुंबईला निघालेल्या लक्झरी रोखल्या !

ई-पास नसल्यानं कुडाळ-सावंतवाडीत पोलिसांची कारवाई

Goan Varta Live | प्रतिनिधी

कुडाळ : महाराष्ट्रात सध्या कडक लॉकडाऊन आहे. प्रवासासाठीही ई-पास पूर्वीप्रमाणेच सक्तीचा करण्यात आला आहे. हेच कारण पुढं करून पोलिसांनी आज तीन लक्झरी बसवर कारवाई केलीय. या बस गोव्यातून मुंबईकडं निघाल्या होत्या. यापैकी एका बसवर सावंतवाडीत तर अन्य दोन बसवर कुडाळ इथं पोलिसांनी कारवाई केली. या बस ताब्यात घेतल्या असून चौकशी चालू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, काही मोजक्याच बसवर कारवाई होत असल्याचा आरोप करत बसमालकांनी नाराजी व्यक्त केल्याचंही समजतं. या बस महालक्ष्मी ट्रॅव्हल्सच्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!