Top 25 | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा एका क्लिकवर

Goan Varta Live | प्रतिनिधी

१ 130 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

राज्यातील सोमवारी नव्या कोरोना रुग्णांची संख्या दीडशेच्या आत, 130 नव्या रुग्णांची नोंद, तर 281 रुग्ण कोरोनातून बरे झाले

२ आणखी दोघा रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

सोमवारी राज्यात आणखी दोघा रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू, एकूण कोरोना बळींचा आकडा 3 हजार 75 वर पोहोचला

३ सक्रिय रुग्णसंख्या 2 हजाराच्या आत

राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या 2 हजाराच्या आत, १ हजार 934 नव्या कोरोना रुग्णांचं निदान, तर रिकव्हरी रेट 97 टक्क्यांच्या पार

४ 12 रुग्णांना सोमवारी डिस्चार्ज

राज्यात कोविड केअर सेंटरमधील बेड्स पुन्हा रिकामे झाले, दुसरी लाट ओसरल्याचं चिन्ह, 12 रुग्णांना सोमवारी डिस्चार्ज, तर 16 रुग्ण नव्यानं रुग्णालयात उपचारासाठी दाखल

५ पॉझिटिव्हिटी रेटमध्ये कमालीची घट

राज्याच्या पॉझिटिव्हिटी रेटमध्ये कमालीची घट, 3 हजार 900पेक्षा जास्त कोरोना चाचण्यांनंतरही रुग्णवाढीचा वेग मंदावल्याचं समोर

६ देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट सुरुच

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट सुरुच, कोरोना बळींचा आकडाही हजारच्या आत, नव्या रुग्णांची संख्या 40 हजाराच्या आत, तर 723 रुग्ण दगावल्या नोंद

पाहा व्हिडीओ –

७ खाणी कधी सुरु होणार? मंगळवारी सुनावणी

खाणसंबधी याचिकेवर मंगळवारी सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी, सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष, कोविडमुळे पुढे ढकलण्यात आलेली सुनावणी 6 जुलै रोजी पार पडणार, खाणी सुरु करण्यास मान्यता मिळणार का, याकडे खाण अवलंबितांची नजर

८ जनसुनावणीवरुन काँग्रेस सरकावर हल्लाबोल

जनसुनावणी रेटण्यासाठी सरकारचं दबावतंत्र, काँग्रेसचा पत्रकार परिषेदतून सरकारवर हल्लाबोल, जनसुनावणी पुढे ढकलण्याची आग्रही मागणी,

९ युतीचा निर्णय हायकमांड घेणार- चोडणकर

गोवा फॉरवर्डसोबत युती करण्याच्या प्रश्नावर गिरीश चोडणकरांचं उत्तर, युतीचा निर्णय हायकमांड घेणार असल्याचं पत्रकार परिषदेमध्ये माहिती

१० भावाने प्रवेश केला, आमदारांची ‘हात’मिळवणी कधी?

सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गांवकर यांच्या भावाचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग, दिगंबर कामत आणि गिरीश चोडणकरांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करत सांगेत मोर्चेबांधणीला सुरुवात, लवकरच प्रसाद गांवकरही काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

११ नाईक हल्लाप्रकरणाचा तपास आता क्राईम ब्रांचकडे

सामाजिक कार्यकर्ते नारायण दत्ता नाईक यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी अटक करणाऱ्या आलेल्या मुख्य संशयित आरोपीला ३ दिवसांची पोलिस कोठणी, हल्ल्याची सुपारी देणारा अटकेत, हल्लेखोरांचा शोध सुरु, तर पुढील तपास क्राईम ब्रांचकडे

पाहा व्हिडीओ –

१२ रानडुक्कर उपद्रवी प्राणी म्हणून लवकरच घोषित

रानडुक्कर उपद्रवी प्राणी म्हणून घोषित करण्याच्या प्रक्रियेला गती, वन खात्याच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश, शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता

१३ एकापाठोपाठ एक गुरं कशी काय दगावली?

एकापाठोपाठ एक गुरं दगावल्यातील वास्कोतील सडा परिसरात खळबळ, विष देऊन गुरांना मारल्याचा स्थानिकांना संशय, सखोल चौकशी करण्याची मागणी, नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांच्याकडूनही घटनेची दखल

१४ भीषण अपघातात गोंयकार कुटुंब उद्ध्वस्त

मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या भीषण अपघातात गोंयकार कुटुंब उद्ध्वस्त, आई वडिलांसह ४ वर्षांच्या मुलाचा जागी मृत्यू, 1 जुलैची थरारक घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद

15 चोर्ला घाटात ३ गाड्यांचा विचित्र अपघात

चोर्ला घाटात रविवारी घटना भीषण अपघात, अपघातमध्ये तीन वाहनांची विचित्र टक्क, पण सुदैवानं जीवितहानी नाही, दोन ट्रक आणि कारची एकमेकांना धडक

पाहा व्हिडीओ –

16 बंदी असूनही अवजड वाहनांची वाहतूक सुरुच

अवजड वाहनांना बंद असूनही चोर्ला घाटामध्ये सर्सार आदेशाची पायमल्ली, चोर्ला घाटातून अवजड वाहनांची वाहतूक कुणाच्या आर्शीवार्दानं सुरु, स्थानिकांचा प्रशासनाला सवाल

17 10 दिवसांत केरी चेकपोस्टवर 2500 चाचण्या

केरी चेकपोस्टवर गेल्या 10 दिवसात पार पडल्या अडीच हजार कोरोना चाचण्या, परराज्यातील येणाऱ्यांची चेकपोस्टवर कसून तपासणी, दरदिवशी साडे तीनशे ते चारशे चाचण्या केल्या जात असल्याची माहिती, आतापर्यंत चाचणीत आढळले 4 पॉझिटिव्ह रुग्ण

18 आगीनंतर स्फोटाच्या आवाजांनी केपे हादरलं

शनिवारी रात्री केपेमध्ये दोन दुकानांना भीषण आग, आगीत दुकानांचं प्रचंड मोठं आर्थिक नुकसान, दुकानातील सामान पूर्णपणे जळून खाक, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही

19 टॉवर आहे, पण नेटवर्क नाही, विद्यार्थ्यांचे हाल

साखळीतील सुर्ला पाळी गावात मोबाईल टॉवर आहे, पण नेटवर्कच नाही, नेटवर्कअभावी ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा, तातडीनं उपाययोजन करण्याची विद्यार्थी आणि पालकांची मागणी

२० दिलासा! अखेर राज्यातील सलून उघडले

सोमवारपासून अखेर राज्यातील सलून उघडले, क्रीडा मैदानं आता उघडी ठेवण्यात मुभा, काही प्रमाणात निर्बंध शिथिल केल्यानं अनेकांना दिलासा

२१ महाराष्ट्रात भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन

महाराष्ट्र अधिवेशनात ‘राडा’ ; सभागृहात गैरवर्तन केल्याटा ठपका ठेवत भाजपच्या 12 आमदारांचं एका र्षासाठी निलंबन, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी.

२२ अभिजीत मुखर्जी यांचा काँग्रेसला रामराम

वरीष्ठ काँग्रेस नेता अभिजीत मुखर्ज यांचा काँग्रेसला रामराम, प्रणव मुखर्जी यांचे पुत्र असलेल्या अभिजी मुखर्जी यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश, राजकीय चर्चांना उधाण

२३ ट्विटर बॅकफूटवर, तक्रार अधिकारी नेमले जाणार

अखेर ट्विटर नमलं, नवे तक्रार अधिकारी नेमले जाणार असल्याची ट्विटरकडून माहिती, नव्या नियमांवरुन केंद्र आणि ट्विटरमध्ये रंगला होता वाद

२४ 52व्या इफ्फीच्या तारखा ठरल्या

52 व्या इफ्फीच्या तारखा ठरल्या, प्रकाश जावडेकरांच्या हस्ते इफ्फीच्या पोस्टर आणि नियमावलीचं प्रकाशन, 20 ते 28 नोव्हेंबरदरम्यान पार पडणार इफ्फी

2५ फिलिपीन्स विमान दुर्घटनेत 47 जवानांचा मृत्यू

फिलिपीन्समध्ये मोठी विमान दुर्घटना, 47 जणांचा मृत्यू, 49 जण गंभीर जखमी, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती, लष्कराच्या विमान दुर्घटनाग्रस्त होऊन 40हून अधिक जवानांचा दुर्दैवी अंत

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!