Top 20 | Superfast बातम्या | One Liners | आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी

महत्त्वाच्या घडामोडी एका ओळीत

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

१ शुक्रवारी संपूर्ण देशभारत ४ हजारपेक्षा जास्त रुग्ण दगावले, तर ४ लाखापेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. वाचा सविस्तर आकडेवारी

२ फेसबूक कमेंटची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याचं पाहायला मिळालं आहे. वाचा सविस्तर

३ फलोत्पादनकडून स्थानिक भाज्यांच्या दरात मोठी कपात करण्यात आल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत. वाचा सविस्तर

४ अभिनेत्री कंगना रणौतलाही कोरोनाली लागण झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. वाचा सविस्तर

५ कर्फ्यूची घोषणा केल्यानंतर राज्यात वेगवेगळ्या भागात लोकांनी किराणा घेण्यासाठी दुकानांबाहेर रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.
वाळपई, फोंडासह म्हापाशातील आढावा पाहण्यासाठी शहरांवर क्लिक करा.

६ वाढत्या कोरोना, उद्यापासूनचा कर्फ्यू आणि कडक निर्बंध याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील असंख्य मजुरांची पुन्हा एकदा आपल्या घराच्या दिशेने पायपीट करण्यास सुरुवात झाली आहे.

७ डिसेंबर महिन्यात कोणतीही बंधन न घालता पूर्णपणे पर्यटन सुरु केल्यामुळे आणि प्रशासनातील त्रुटींमध्ये गोव्यातील स्थिती चिघळल्याची टीका आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सीएनएनशी बोलताना केली आहे.

८ राज्य आणि केंद्र सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, सरकार प्रमाणित पत्रकार, माध्यमकर्मी, बँकेतील संपूर्ण यंत्रणा, टेलिकॉम क्षेत्रातील कर्मचारी आणि त्याचप्रमाणे दिव्यांग, जेष्ठ यांना घरोघरी सेवा देणाऱ्यांचा फ्रंटलाईन कोरोना वर्कसमध्ये समावेश करण्यात आल्याचं सरकारी आदेश काढत जाहीर करण्यात आलं आहे.

९ उद्यापासून गोव्यात प्रवेश करायचा असल्यास आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट किंवा व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट अनिवार्य करण्यात आलं आहे.

१० उद्यापासून राज्यातील लग्नसमारंभांसह सर्वच कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.

११ उद्यापासून राज्यात सकाळी ७ ते दुपारी १ यावेळेच दुकानं उघडी राहणार असून मेडिकल दिवसभर सुरु राहणार आहेत.

१२ ओळखपत्र, RT-PCR रिपोर्ट नसला, तरी कोविड संशयित रुग्णांना दाखल करुन घ्यावं लागणार, असे निर्देश देत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राष्ट्रीय धोरणात मोठे बदल केले आहेत.

१३ वाढत्या कोरोनामुळे मिझोरम आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांनी कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

१४ पेडण्यात कोविड सेंटर सुरु करण्याची पाहणी करुन गेल्यानं बाबू आजगावंकर यांच्यावर प्रवीण आर्लेकरांनी टीका केली आहे.

१५ माजी हॉकीपटू रवींदर पाल सिंह यांचे कोरोनामुळे निधन झालं आहे.

१६ कोरोनामुळे मधुमेहींना ‘म्युकर मायकोसिस’ होण्याचा धोका असल्याचं समोर आलं आहे. वाचा सविस्तर

१७ केवळ बारावी पास असणारा डॉक्टर चक्क कोविड रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाचा सविस्तर

१८ भारताच्या कठीण काळात अमेरिकेने मदतीचा हात पुढे केला आहे. वाचा सविस्तर बातमी

१९ आतापर्यंत ४ वेळा पॉझिटिव्ह आलेल्या तरुणानं कोरोनावर मात करुन प्लाझमा दान करण्याचं मोठं काम हाती घेतलंय. सकारात्मक बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.

२० संगीतकार वनराज भाटिया यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. वाचा सविस्तर

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!