Top 20 | महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा

महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

1 देशात नव्या ४५ हजार ८९२ कोरोना रुग्णांची भर

देशात नव्या ४५ हजार ८९२ कोरोना रुग्णांची भर, तर ४४ हजार २९१ रुग्ण कोरोनातून बरे झाले, केंद्रीय आरोग्यमंत्रालयाकडून आकडेवारी जारी

2 गुरुवारी ८१७ जणांचा देशभरात कोरोनामुळे मृत्यू

गुरुवारी ८१७ जणांचा देशभरात कोरोनामुळे मृत्यू, एकूण कोरोना बळींचा आकडा ४ लाख ५ हजाराच्या पार, मृत्यूसंख्या घटली, पण रुग्णवाढीमध्ये थोड्याप्रमाणात वाढ, देशाचा रिकव्हरी रेट ९७.१८ टक्क्यांवर

3 पुढचे ४८ तास मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात आजपासून पुढचे ४८ तास मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज, विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा जोर पकडणार

4 राज्यातील पेट्रोलचे दर सेन्चुरी मारण्याची शक्यता

राज्यातील पेट्रोलचे दर सेन्चुरी मारण्याची शक्यता, गेल्या १० दिवसांत पेट्रोल डिझेलच्या किंमतीत दीड ते दोन रुपयांची वाढ, सर्वसामान्यांना इंधन दरवाढीचा फटका, इंधन दरवाढीमुळे सर्वच गोष्टी महागण्याची शक्यता

5 केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, ४३ नवीन मंत्री

अखेर मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, ४३ नवीन मंत्री, १५ कॅबिनेट तर २८ राज्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा बुधवारी संध्याकाळी संपन्न

6 श्रीपाद नाईकांच्या खात्यामध्येही बदल

केंद्रीय आयुष मंत्रालयाची जबाबदारी असणाऱ्या श्रीपाद नाईकांच्या खात्यामध्येही बदल, श्रीपाद नाईक यांच्या बंदर, जहाज, जलवाहतूक आणि पर्यटन खात्याच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी

7 मंत्रिमंडळ विस्ताराआधी १३ केंद्रीय मंत्र्यांना डच्चू

नव्या मंत्रिमंडळ विस्ताराआधी १३ केंद्रीय मंत्र्यांना डच्चू, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह, रमेश पोखरीयाल निशंक, प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद आदींचेही राजीनामे

8 नारायण राणेंनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ

नारायण राणेंनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ, नारायण राणेंना सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी, राणेंसह कपिल पाटील, भागवत कराड आणि डॉ. भारती पवार यांनाही मंत्रिपदं

हेही वाचा : CRIME UPDATE | रॉय फर्नांडिस मारहाण प्रकरणी तिघांना अटक

9 माझी पत्नीही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक

माझी पत्नीही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक, कळंगुटचे आमदार आणि मंत्री मायकल लोबोंच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

10 भाजपशी युती करणार नाहीच- सुदिन ढवळीकर

भाजपशी युती करणार नाहीच, मगो आमदार सुदिन ढवळकरांचं पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य, तर ऑनलाईन शिक्षणातील त्रुटींवरुनही सरकारवर जोरदार टीका

11 म्हापसा बाजारपेठ पूर्ण क्षमतेनं खुली

म्हापसा बाजारपेठ पूर्ण क्षमतेनं खुली, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचे आव्हान कायम, कोरोनाविषयक नियम पाळण्याचं नगराध्यक्षांचं लोकांना आवाहन

हेही वाचा : म्हापशाचे माजी नगरसेवक मार्टिन कारास्को यांचं निधन

12 कोंब मडगावमध्ये सिलिंडरचा स्फोट

कोंब मडगावमध्ये सिलिंडरचा स्फोट, सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी नाही, पण घरातील सामानाचं प्रचंड नुकसान, स्फोटाचा आवाजानं आजूबाजूचा परिसर हादरला

13 ‘पर्यावरण सांभाळूनच एन्टरटेन्मेन्ट सिटीचा प्रकल्प’

पर्यावरण सांभाळूनच एन्टरटेन्मेन्ट सिटीचा प्रकल्प होणार, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकरांचं वक्तव्य, प्रकल्पाला विरोध न करण्याचंही आजगावकरांचं आवाहन

14 पुन्हा एकदा खडसेंना ईडीचा फेरा

एकनाथ खडसेंची प्रकृती खालावल्याची माहिती, ईडीसमोर गुरुवारी चौकशीलाही हजर राहण्याचे होते निर्देश, खडसेंची पत्रकार परिषदही रद्द

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरा, पण प्रत्येक ठिकाणी नाही; जाणून घ्या आरबीआयचे नियम

15 २४ तासांत 5 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरमध्ये २४ तासांत 5 दहशतवाद्यांचा खात्मा; हिजबुलचा टॉपचा दहशतवादी ठार, 3 वेगवेगळ्या ठिकाणी पार पडलेल्या चकमकींमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा

terror

16 विमान दुर्घटेत २८ जणांचा मृत्यू

रशियात झालेल्या विमान दुर्घटेत २८ जणांचा मृत्यू, दुर्घटनाग्रस्त विमानाला जलसमाधी, बेपत्ता झालेल्या विमानाचा अखेर शोध लागला

17 हैतीचे राष्ट्रपती जोवेनल मॉईस यांची हत्या

हैतीचे राष्ट्रपती जोवेनल मॉईस यांच्या हत्येनं खळबळ, गोळ्या घालून जोवेनल मॉईन यांचा खून, हल्ल्यात त्यांची पत्नी जखमी झाल्याची माहिती

18 जायबंदी गिल पुन्हा भारतात परतणार

इंग्लंडविरुद्धची टेस्ट सीरिज सुरु होण्यापूर्वीत शुभमन गिल भारतात परतणार, पायाला झालेल्या दुखापतीमुळे शुभमन गिलची इंग्लंड दौऱ्यातून एक्झिट

19 विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत फेडररचा स्वप्नभंग

विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत फेडररचा स्वप्नभंग, उपांत्यपूर्व फेरीत युवा हुर्काझकडून पराभूत, रॉजर फेडररच्या धक्कादायक पराभवानं चाहतेही हळहळले

20 दिलीप कुमार यांना अखेरचा निरोप

वयाच्या ९८व्या वर्षी दिलीप कुमार यांचं निधन, कोविड प्रतिबंधन नियमांचं पालन करत दिलीप कुमार यांना अखेरचा निरोप

हेही वाचा : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक, दुप्पट मिळेल फायदा

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!