TOP 20 | One Liners | महत्त्वाच्या घडामोडी एका वाक्यात

महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

१ संपूर्ण देशात गेल्या २४ तासांत नव्या ३ लाख ६६ हजार १६१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर ३ लाख ५३ हजार ८१८ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

२ केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण देशात गेल्या २४ तासांत तब्बल ३ हजार ७५४ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा २ लाख ४६ हजार ११६वर पोहोचला आहे.

३ पुन्हा देशव्यापी लॉकडाऊन करा, अशी मागणी पत्र लिहून आयएमएने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

४ केंद्र सरकारकडून कोरोनाला रोखण्यासाठी जी पावलं उचलली जात आहेत, त्याचा वस्तूस्थितीशी काहीही संबंध नसल्याचा आरोप आयएमएने केला आहे.

५ भारतातीन कोरोनाचा नवा स्ट्रेन अत्यंत घातक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलंय.

६ रविवारी राज्यात नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या जास्त नोंदवण्यात आली आहे. असं कसं झालं? वाचा सविस्तर

७ राज्यात रविवारी पुन्हा ६० पेक्षा जास्त रुग्ण दगावले असून अवघ्या ९ दिवसांत तब्बल ४०० पेक्षा जास्त जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वाचा सविस्तर आकडेवारी

८ लस न घेतलेल्या लोकांमध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त असल्याचं दिसून आलं आहे. वाचा काय म्हणाले आरोग्य सचिव

९ गोव्याच्या एन्ट्रीपॉईन्टवर चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून कसून तपासणी केली जाते आहे.

१० सोमवारी बाजार उघडताच सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारुन ४९ हजार ५७८वर पोहोचला होता, तर निफ्टी १४ हजार ९२६ वर असल्याचं पाहायला मिळालं.

११ गोवा फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष लाविन रिबेलो यांचं निधन झालं असून रविवारी संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

१२ राज्यात रेमडेसिविर इंजेक्शन कुठे मिळणार, यासाठी काही एजेन्सी सरकारनं निश्चित केल्या असून त्यांचे संपर्कही जारी करण्यात आले आहेत. वाचा सविस्तर

१३ राज्यातील कर्फ्युमुळे पर्यटकांनी गजबजलेले असणारे समुद्र किनारे सुने सुने झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पाहा फोटो स्टोरी

१४ राज्यात पहिल्या दिवशी कर्फ्यूला उत्तम प्रतिसाद मिळाला असून सगळ्यांनी शिस्तबद्धपणे सरकारच्या नियमांचं पालन केल्याच पाहायला मिळालंय. पाहा कर्फ्यूच्या पहिल्या दिवसाची फोटोस्टोरी

१५ गोव्यात येण्यासाठी आता आरटी-पीसीआर चाचणी किंवा कोविड लसीकरण बंधनकारक करण्यात आलं असून तसे निर्देशही जारी करण्यात आले आहेत.

१६ गोवा शिख युवकांनी आदर्श उपक्रमाचं आयोजन करत जीएमसीतील गरजूंना मोफत जेवणाची सोय देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

१७ वाढत्या कोरोनामुळे दिल्लीतील मेट्रोसेवा १७ मे संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

१८ कळंगुट समुद्र किनारी फिरण्यासाठी गेलेल्या दोन जोडप्यांवर कळंगुट पोलिसांनी कारवाई केली असून या जोडप्यांपैकी दोघा तरुणांना अटक करण्यात आली आहे, तर तरुणांनी सोडून देण्यात आलंय.

१९ केंद्र सरकारकडून २५ राज्यांना विशेष निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे मात्र या २५ राज्यांत गोव्याचा समावेश नाही.

२० आसामच्या मुख्यमंत्री पदाची शपथ हे हिमत बिस्वा शर्मा घेणार असून सर्वानंद सोनोवाल यांनी आपला राजीनामा रविवारी राज्यपालांकडे सुपूर्द केलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!