Superfast Updates | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फटाफट, एका वाक्यात एक बातमी

बातम्यांचा झटपट आढावा

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

म्हापशाच्या नगरसेवक शुभांगी वायंगणकर यांनी भाजपात प्रवेश केला असून म्हापशेकारांचो एकवटात फूट पडल्यानं आता सत्तास्थापनेचा भाजपचा मार्ग मोकळा झाला आहे.

रुग्णवाढ आणि मृतांच्या आकड्यासोबत आजपासून सरकार हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झालेल्यांचाही आकडा जाहीर करणार असून गुरुवारी १९२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वाचा सविस्तर

गेल्या २४ तासांत राज्यात नवे ३,८६९ कोरोनाबाधित आढळून आले असून एकूण बाधितांची संख्या १,०८,२६७वर पोहोचली आहे, तर आणखी २,०२३ जण कोरोनामुक्त झालेत.

राज्यात आणखी ५८ जणांचा कोरोनामुळे जीव गेलाय तर आता एकूण मृतांचा आकडा १,५०१वर पोहोचलाय.

लोकांचे जीव वाचविण्यासाठी राज्यात पंधरवड्याचे कडक लॉकडाऊन हवे, अशी जीसीसीआयनं मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे.

कासांवली प्राथमिक आरोग्य केंद्र कोविड- १९ इस्पितळ म्हणून अधिसूचित करण्यात आला असून आपत्कालीन विभाग तळ- मजल्यावर कोविड-१९ इस्पितळ वरील दोन मजल्यांवर चालवलं जाणार आहे.

म्हापसा पोलिसांकडून गांधी चौकाजवळ कारवाई करत १.९० लाखांचा गांजा जप्त करण्यात आला असून मुलूंड-मुंबई येथील दिलीप रत्नाजी या संशयितास अटक करण्यात आला आहे.

कोलवाळ कारागृहातील एका जेल गार्डचा आज कोरोनाने मृत्यू झालाय तर कोरोनाबाधित इतर १० कैदी व ३ कारागृह कर्मचारी सध्या गृह विलगीकरणात आहेत.

कडक निर्बंध घालण्याऐवजी पंचायत क्षेत्रांत स्टेप अप इस्पितळे स्थापन करण्यावर भर द्यावा, असा सल्ला डॉ. मधू घोडकिरेकर यांनी दिलाय.

१० मेपासून राज्यात येणाऱ्या प्रवासी, पर्यटकांना कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य करा तसंच कोविडवर उपचार करणाऱ्या सरकारी इस्पितळांना पोलिस संरक्षण द्या असे निर्देश उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला दिलेत. वाचा सविस्तर

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातून स्वॅब तपासणी सेंटर रवींद्र भवन मडगाव येथे स्थलांतरित करण्यात आलं असून सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत रॅपिड अँटिजन तपासणी आणि आरटीपीसीआर तपासणीसाठी स्वॅब या ठिकाणी घेण्यात येतील.

संकल्प आमोणकरांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. वाचा सविस्तर

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर म्हापशातील बार्देश बाजार येत्या रविवारपर्यंत बंद ठेवला जाणार आहे.

संपूर्ण देशभारत ४ लाखापेक्षा नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून जवळपास ४ हजार रुग्ण कोरोनामुळे संपूर्ण देशभरात दगावलेत. वाचा सविस्तर आकडेवारी

वाढत्या कोरोना केसेस लक्षात घेऊन उसगाव गांजे पंचायतीने शुक्रवार 7 मे ते 14 मे असे 8 दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

सांगे मतदारसंघाचे आमदार यांनी उद्यापासून संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. वाचा सविस्तर

सत्तरी तालुक्यातील अनेक गावांकडूनही आता लॉकडाऊन घोषणा व्हायला सुरुवात झाली आहे.

दोडामार्गातून गोव्यात जाणाऱ्या कामगारांसाठी विशेष नियमावली लागू करण्यात आली आहे. वाचा नियमावली सविस्तर

गोवा विधानसभेचे माजी सभापती मुरगावचे माजी आमदार शेख हसन हरूण (८४) यांचे निधन झालंय. वाचा सविस्तर

माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह यांचं कोरोनामुळं निधन झालंय. वाचा सविस्तर

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!