SUPERFAST NEWS | महत्त्वाच्या घडामोडींचा Express आढावा

दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा

Goan Varta Live | प्रतिनिधी

सरकारमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना एक वर्षांची मुदतवाढ

ऑक्टोबर 2022 पर्यंत मूल्यमापन करुन मुदतवाढ मिळणार असून कार्मिक खात्याकडून मुदतवाढीबाबत आदेश जारी करण्यात आला आहे.

कोविडमुळे राज्यात आणखी 4 रुग्ण दगावल्यानं चिंता

नव्या 61 रुग्णांची नोंद, 148 रुग्ण कोरोनातून बरे झाले, तर राज्याची सक्रिय रुग्णसंख्या 900च्या आत. सध्या गोव्यात 896 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु

संजीवनी साखर कारखाना सुरु करण्याचे प्रयत्न सुरु

केंद्राकडून 58 कोटीचं आर्थिक सहाय्य मिळणार, तसंच ठरलेल्या दरानुसार ऊस उत्पादकांना दर देण्यास सरकार कटीबद्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

काँग्रेसकडून रणनिती आखण्यासाठी पी. चिदंबरम यांची नियुक्ती

गोव्याचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक म्हणून ज्येष्ठ नेत्यांना दिलं पद

23 कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

सपना बांदोडकर – मुख्यमंत्र्यांच्या अवर सचिव, प्रवीण परब -सत्तरीचे उपजिल्हाधिकारी, डॉ.पूजा मडकईकर – जीएडी अवर सचिव, माया पेडणेकर -उपसंचालक दक्षता खाते, श्रीपाद आर्लेकर -उपसंचालक वीज खाते, डॉ. गिता नागवेकर-संयुक्त संचालक माहिती आणि प्रसिद्धी खाते

वेंगुर्लेत ६ पर्सनेट मासेमारी नौकांवर कारवाई

वेंगुर्ले मांडवी खाडीत असलेल्या नवाबाग जेटी येथे मिनी पर्सनेटद्वारे मासेमारी करून आलेल्या ‘निवती येथील ६ नौकांवर वेंगुर्ले मत्स्यखात्याने कारवाई केलीय.

वेंगुर्लेतील तौक्ते चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना ८ कोटीपेक्षा जास्त भरपाई

तौक्ते चक्रीवादळात झालेल्या वेंगुर्ले तालुक्यासाठी नुकसाग्रस्तांसाठी शासनाकडून ८ कोटी ९ लाख ३०० रुपये नुकसान भरपाई देण्यात आली असून बाधितांच्या खात्यात जमा देखील करण्यात आलीय.

जनता गेली खड्ड्यात ; बांदा-दोडामार्ग रस्त्यासाठी भाजपच आंदोलन

बांदा दोडामार्ग रस्त्यावर ठिकठिकाणी रस्त्यावर खड्ड्याचं साम्राज्य आहे. याविरोधात भाजपन जनता गेली खड्ड्यात आंदोलन केलंय .

सिंधुदुर्गात आज 83 कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह

सिंधुदुर्गात  45 हजार 799जणांनी कोरोनावर मात केलीय. तर सक्रीय रुग्णाची संख्या  2 हजार 331चलीय. आज आणखी 83 रिपोर्ट झिटीव्ह आले.

सिंधुदुर्गातून 43 जणांनी कोरोनावर मात

सिंधुदुर्गातून कोरोनामुक्तांच प्रमाण वाढलंय. आज सिंधुदुर्गातून 43 जणांनिकोरोनावर मात

सिंधुदुर्गात आज कोरोनाचा एकही मृत्यू नाही

सिंधुदुर्गात कोरोनामुळे मृतांची संख्या 1 हजार 267 वर पोहचलीय. तर सोमवारी कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही.

राहुल गांधींविरोधात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीतून याचिका

दिल्लीतील बलात्कार पीडित अल्पवयीन मुलींच्या आई-वडिलांचे फोटो ट्विटरवर शेअर केल्यामुळं काँग्रेसचे नेते राहुल गांधी अडचणीत आले आहेत. रत्यांच्याविरोधात रत्नागिरीतील दापोली तालुक्यातून याचिका दाखल करण्यात आली आहे.

16 ऑगस्टपासून 11 वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु होणार

११ प्रवेशाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. १६ ऑगस्टपासून अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे.

महाराष्ट्रात डेल्टा प्लस रुग्णांच्या संख्येत वाढ

राज्यात डेल्टा प्लस रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. २१ वरून ही संख्या ४५ वर गेलेली आहे.

एनसीबीची मोठी कारवाई, एक कोटीहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त

रविवारी मुंबई विमानतळावर एनसीबीची मोठी कारवाई करण्यात आली असून या कारवाईत एक कोटीहून अधिक किमतीची ड्रग्ज जप्त करण्यात आली आहेत. या ड्रग्सह एका परदेशी नागरिकाला अटक करण्यात आली

पिंपरी चिंचवडमध्ये सापडला बॉम्ब

पिंपरी चिंचवडमध्ये शहरातील मध्यवस्तीत असलेल्या कोहिनूर इमारतीच्या परिसरामध्ये खोदकाम सुरू असताना इथं बॉम्ब आढळून आला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाला सरकारच्या उदासीनतेचा फटका : आशिष शेलार

मंदिरे बंद आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवाला सरकारच्या उदासीनतेचा फटका बसला आहे. अशी टीका भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू ; संजय जाधवांच खळबळजनक वक्तव्य

शिवसेना खासदार संजय जाधव यांनी परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या नियुक्तीवरुन राष्ट्रवादीवर टीका केली आहे. राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू शकतो असे वक्तव्य संजय जाधव यांनी केलं आहे.

देशात सापडले करोनाचे नवे व्हेरीयंट ‘इटा’

द. कर्नाटकातील मंगळूर येथे करोनाचा ‘इटा’ हा नवा स्ट्रेन सापडला असल्याचे समजते. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चार महिन्यापूर्वी दुबई येथून परतलेल्या एका व्यक्ती मध्ये गुरुवारी करोनाचा हा स्ट्रेन आढळला.

बिहार सरकारने 80 हजार शिक्षकांना दिले गोणपाट विकण्याचे काम

बिहार सरकारनेआदेश काढून राज्यातील पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व शिक्षकांना मोकळी गोणपाट विकण्याचे काम दिले आहे. या शिक्षकांनी त्यांना दिलेले गोणपाट विकली नाहीत, तर त्यांना पगार मिळणार नाही, असा आदेशही काढण्यात आलाय.

शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईवर फसवणुकीचा आरोप

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची संकटं संपण्याचं नाव घेत नाहीयेत. नखनऊमधील दोन महिलांनी शिल्पा आणि तिच्या आईविरोधात कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

भारतात पुढील तीन वर्षात अमेरिकेच्या दर्जाचे राष्ट्रीय महामार्ग असतील : नितीन गडकरी

भारतात पुढील तीन वर्षांत देशातले सर्व राष्ट्रीय महामार्ग हे अमेरिकेतल्या महामार्गांसारख्या दर्जाचे असतील, असा विश्वास रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

10 ऑगस्टला देशभरात बत्ती गुल होण्याची शक्यता?

देशभरात म्हणजेच 10 ऑगस्ट रोजी पावर कट होऊ शकतो. ऊर्जा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी आणि इंजिनिअर्सने संसदेच्या चालू मान्सून सत्रात वीज विधेयक, 2021 मांडण्याच्या विरोधात 10 ऑगस्टरोजी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

झोपडीत झोपलेल्यांवर काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत 9 जणांचा मृत्यू

सावरकुंडलमधील बाढडा गावाजवळ एका भरधाव वेगात आलेल्या ट्रकने झोपडीला धडक दिली. जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा झोपडीमध्ये लोक गाढ झोपत होती. या दुर्घटनेत 9 जणांचे प्राण गेले आहेत.

जागतिक तापमान वाढीसंदर्भात धोक्याचा इशारा

जागतिक तापमान वाढीबाबत आयपीसीसीनं ने धोक्याची सूचना दिली आहे. २१०० सालापर्यंत पृथ्वीच्या तापमानात २ डिग्री सेल्सियसने वाढ होईल असं सांगण्यात आलं आहे.

पाकिस्तान: क्वेटामध्ये स्फोट, दोन पोलीस ठार, ८ जखमी

पाकिस्तानमधील बलुचिस्तानमधील प्रांताची राजधानी क्वेटामध्ये बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात दोन पोलीस ठार झाले. तर, आठजण जखमी झाले.

बांगलादेशात हिंदूंची दुकानं आणि मंदिरांवर हल्ला

बांगलादेशातल्या खुलना जिल्ह्यातल्या रुपसामध्ये हिंदुंची दुकानं आणि मंदिरं फोडण्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 10 लोकांना अटक केली आहे.

जगातील सर्वात मोठ्या टायरच्या डम्पयार्डमध्ये अग्नितांडव

कुवेतच्या सुलैबिया शहरात असलेल्या जगातील सर्वात मोठ्या टायरच्या डम्पयार्डमध्ये आग लागली आहे.  आगीमुळे येथील हवा अधिकच विषारी झाली आहे. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!