Photo Story | विजया नाईक यांना अखेरचा निरोप

सोमवारी झालेल्या भीषण अपघातात विजया नाईक यांचं निधन

Goan Varta Live | प्रतिनिधी

सोमवारी श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातानं नाईक कुटुंबीयांवर मोठा आघात केला. श्रीपाद नाईक यांची पत्नी विजया नाईक यांचं या अपघातात निधन झालं. विजया नाईक यांच्या जाण्यानं अनेकांना धक्का बसला.

विजया नाईकांच्या जाण्यानं हळहळ

नाईक कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

अंत्यदर्शनासाठी अनेकांची गर्दी

विजया नाईक… केंद्रीय आयुषमंत्र्यांची पत्नीचं अपघाती निधन सगळ्यांच्या मनाला चटका लावून गेलं. त्यांच्या निधनानं श्रीपादभाऊंच्या मागे सतत असणारी सावली कायमची मिटली. श्रीपाद नाईकांच्या जारकीय चढउतारात त्या ठामपणे नेहमी त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या. केंद्र सरकारमध्ये एक महत्त्वाच पम श्रीपाद नाईकांना मिळल्यानंतरही विजया नाईक यांच्या वागण्या बोलण्यात कधीही बदल झाला नाही…किंवा आदरातिथ्याची उणीव, गुर्मी दिसली नाही…

आधी सापेंद्र रायबंदर, नंतर आडपईतील निवासस्थानी पार्थिव आणलं

पाहा व्हिडीओ –

विजया नाईक यांच्यावर आज अंत्यसंस्कार

तब्बल चाळीस वर्ष आपल्या मोठ्या कुटुंबाला आधार देत घरी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा त्यांनी तेवढ्याच आपुलकीनं आणि आग्रहानं पाहुणचार केला. कुटुंबातील वडिलकीच्या नात्यानं स्वतःच्या लेकी सुनांबरोबरच सर्व छोट्यामोठ्यांना त्यांचा आधार वाटायचा. आडपई गावाशी जिव्हाळ्याचं नातं सांगणारं एक मातृतूल्य व्यक्तिमत्तव काळाच्या पडद्याआड गेलंय. मूळच्या कुंडईच्या असलेल्या विजया नाईक यांनी आपल्या माहेरातील अध्यात्मिक परंपरा आणि संस्कार तसंच समाजाप्रती असलेला आपुलकीचा वसा आजन्म जपला… त्यांच्या मृत्यूची बातमी धडकताच आडपई गावावर शोककळा पसरलीये.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा –

श्रीपाद नाईकांप्रमाणेच मुंडे, फालेरोंच्या अपघातांनी अंगावर काटा

खासगी डेटा वाचवण्यासाठी WhatsApp डिलीट करणं, हाच एकमेव मार्ग उरलाय?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!