गोवनवार्ता लाईव्हचा दणका! अखेर वादग्रस्त वटहुकुम रद्द- पाहा सविस्तर
Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : वर्षाच्या सुरुवातीलाच विषय गाजला तो पालिका कायद्याच्या नव्या वटहुकुमाचा. या वटहुकुमावरुन आक्रमक झालेल्या व्यापारी संघटनेनं मार्केट बंदचा इशाराही दिला. ज्या वटहुकुमामुळे राज्यातील व्यापारी संघटना बंद करायला निघाल्या होत्या, तो वटहुकुम नेमका आहे तरी काय? तो कुणाच्या भल्यासाठी आहे? व्यापाऱ्यांचं त्यामुळे नेमकं काय नुकसान होणार आहे? … यासारख्या अनेक प्रश्नांबाबत कायदेतज्ज्ञांशी आम्ही बातचीत केली. दरम्यान, गोवनवार्ता लाईव्हच्या बातमीचा दणकाही पाहायला मिळाला. अखेर हा वटहुकुम राज्यपालांनी रद्द केलाय. त्यामुळे दुकानदारांनी केलेल्या तीव्र विरोधानंतर सरकारानं नमतं घेतल्याची चर्चा रंगली आहे.
नेमका हा वटहुकुम कुणाच्या फायद्याचा होता, हे गोवनवार्ता लाईव्हनं समजून घेण्याचा आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. पाहा त्याच संदर्भातली सविस्तर चर्चा
नवा वटहुकुम कुणाच्या फायद्याचा? भाग 01
हेही वाचा – भारतातल्या कुबेराला ‘सेबी’चा दणका
नवा वटहुकुम कुणाच्या फायद्याचा? भाग 02
हेही पाहा – मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर व्यापारी नरमले!