Live Updates | पावसाळी अधिवेशन | दिवस तिसरा | विधानसभेचा आखाडा, ताज्या घडामोडी

हे पेज सातत्यानं Update होत आहे, कृपया वाचून झाल्यानंतर Refresh करा.

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

Live Update

6.42 PM : राष्ट्रगीतानं सभागृहाचं कामकाज स्थगित, तीन दिवसीय पावसाळी अधिवेशनाचा समारोप

Live Update

6.35 PM : गोवा स्वयंपूर्ण करण्यासाठी पंचायतनिहाय मंत्र्यांचे दौरे : मुख्यमंत्री

Live Update

6.07 PM : सर्व पंचायत क्षेत्रातील घरांना मिळणार घरक्रमांक- पंचायत दुरूस्ती विधेयक बील मंजूर, ग्रामिण भागांतील कौलारू घरांवर स्लॅप घालण्यासाठी मंजूरी देणार

Live Update

6.07 PM : जमिन, घरांची मालकी देणारे गोवा भूमी अधिकारिता बील मंजूर

Live Update

6.00 PM : सरकारी जमिनीवर घरं बांधलेल्यांना नियमाप्रमाणे शुल्क आकारून घरं नावावर करून देणार : मुख्यमंत्री

Live Update

5.57 PM : गोवा भूमी अधिकारिता बिल मुख्यमंत्र्यांकडून सभागृहाच्या पटलावर

Live Update

5.47 PM : वीज खात्याशी निगडित विधेयकांना मंजुरी, स्ट्रिटलाईटबाबत वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्याकडून माहिती

Live Update

5.28 PM : महसूल खात्याशी निगडित विधेयकांना मंजुरी

Live Update

5.23 PM : विरोधकांच्या अनुपस्थितीत अनेक विधेयकांना मंजुरी

Live Update

5.21 PM : म्हणणं ऐकून घेतलं जात नसल्यानं विरोधी आमदारांनी केला सभात्याग

Live Update

5.20 PM : गोंधळात विधेयकांना मंजुरीची कार्यवाही सुरू, विरोधकांना न जुमानता सभापतींकडून कामकाज

Live Update

5.16 PM : संतप्त विरोधकांकडून घोषणाबाजी, आमदारांनी हिसकावल्या सभागृह कर्मचार्‍यांच्या टोप्या, सभापतींकडे टोप्या फेकल्या

Live Update

5.15 PM : विरोधकांचा गोंधळ, गोंधळातच कामकाज सुरू, सभागृह कर्मचार्‍यांनी सभापतींच्या हौदासमोर विरोधकांना रोखलं

Live Update

4.55 PM : विरोधक संतप्त, सभापतींच्या आसनाकडे धाव, पुराच्या संदर्भातील लक्षवेधी सुचनेनंतर आजची सर्व विधेयक चिकीत्सा समितीकडे देण्याच्या मागणीवर निवाडा द्या मागणीसाठी विरोधकांची सभापतींच्या आसनाकडे धाव. सभागृह 15 मिनिटांसाठी तहकूब

Live Update

4.52 PM : तिळारी धरणामुळे साळ गावात पूर, नेमकी कारणं तपासा : सभापतींची मुख्यमंत्र्यांना सूचना

Live Update

4.48 PM : एखादा पूरग्रस्त मदतीशिवाय राहिल्याचं निदर्शनास आल्यास सरकारला कळवा : मुख्यमंत्री

Live Update

4.40 PM : भरपाईचे निकष काय आहेत? खंवटेंचा सवाल

Live Update

3.37 PM : घरं कोसळलेल्यांना 15 ऑगस्टपर्यंत मदत देणार : मुख्यमंत्री, दुभती गुरं वाहून गेल्यास गुरामागे 30 हजारापर्यंत मदत : मुख्यमंत्री

Live Update

4.30 PM : 20 ते 25 मातीची घरं कोसळली, दोन लाखांपर्यंत मदत देणार : मुख्यमंत्री, पूर्ण नवे घर बांधून देणं अशक्य : मुख्यमंत्री

Live Update

3.55 PM : तौक्ते वादळग्रस्तांना नुकसान भरपाईबाबत दिलेल्या उत्तरावरून लुईझिन फालेरो संतप्त, दिशाभूलकारक उत्तर देणार्‍या अधिकार्‍यांना घरी बसवा : फालेरो

Live Update

3.50 PM : सभागृहात बोलण्यावरील वेळमर्यादेवरून विरोधक नाराज

Live Update

3.44 PM : नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी सरकार सक्षम आहे का? रोहन खंवटे

Live Update

3.38 PM : बेसुमार वृक्षतोडीमुळे नद्यांना पूर : रोहन खंवटे

Live Update

3.32 PM : पूरग्रस्तांना नुकसान भरपाईचे निकष बदला : विरोधी पक्षनेते

Live Update

3.30 PM : तौक्ते वादळग्रस्तांना 6 हजारांची नुकसान भरपाई तुटपुंजी : विरोधी पक्षनेते

Live Update

3.20 PM : सर्वसामान्यांना दिलासा द्यायचाच असेल, तर पडलेली घरं सरकारनं बांधून द्या, दहा लाखांची मदत द्या : विजय सरदेसाई, 92 लाखांची मदत हास्यास्पद : सरदेसाई

Live Update

3.17 PM : वादळग्रस्तांना मदत देण्यासाठी स्थानिक अधिकार्‍यांना निर्देश द्या, बाहेरील अधिकार्‍यांवर सर्व सोपवू नका : विजय सरदेसाई

Live Update

3.15 PM : नद्या, नाले, बांध हे आधीपासून अस्तित्त्वात, पुरामागची कारणं शोधा : विजय सरदेसाई

Live Update

3.10 PM : सरकारनं स्पेशल टीम नियुक्त करून घरांच्या नुकसानीचा आढावा घ्यावा : रवी नाईक

Live Update

3.05 PM : नदीवरील बंधार्‍यांना झाडं अडकून पुराचं पाणी तुंबलं : मुख्यमंत्री

Live Update

2.59 PM : 1 हजार 83 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू पोहोचवल्या, आतापर्यंत 91 लाख रुपयांच्या आसपास मदत : मुख्यमंत्री

Live Update

2.57 PM : मातीचं घर पूर्ण कोसळल्यास 15 ऑगस्टपूर्वी दीड ते दोन लाख, घराचं नुकसान झाल्यास 1 लाखापर्यंतची मदत, कमी नुकसान झालेल्यांना 25 ते 50 हजार रुपयांपर्यंत मदत

Live Update

2.54 PM : सरकारी अधिकारी व्यवस्थित काम करत नाहीत, पुरानंतरच्या नुकसानीचा सर्वे व्यवस्थित होत नाही : ढवळीकर

Live Update

2.53 PM : उत्तरेत 749, दक्षिणेत 806 घरांचं नुकसान : मुख्यमंत्री

Live Update

2.48 PM : मच्छीमारांचे नुकसान किती? घरं पडलेल्यांना कधीपर्यंत घरं बांधून देणार : ढवळीकर

Live Update

2.45 PM : पाऊस, पूर यावर चर्चा, सुदिन ढवळीकर यांनी उपस्थित केला मुद्दा, 1982तील पावसाचा संदर्भ देऊन विचारला प्रश्न

Live Update

2.30 PM : विधानसभा कामकाजाला सुरुवात

Live Update

1.08 PM : सभागृह पुन्हा तहकूब, अडिच वाजेपर्यंत कामकाज तहकूब

Live Update

1.06 PM : विनायक विष्णू खेडेकर, मीराबाई चानू, यश सावर्डेकर, राजतिलक नाईकसह अनेकांच्या अभिनंदनाचे ठराव

Live Update

1.05 PM : हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी निवड झाल्याबद्दल राजेंद्र आर्लेकर यांचं सभागृहात अभिनंदन

Live Update

1.00 PM : विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात

Live Update

11.45 AM : कोळसा खाण प्रश्नावरील चर्चेसाठी विरोधक ठाम, आक्रमक विरोधकांनी सभापतींच्या आसनाकडे धाव घेतल्यामुळे कामकाज १ वाजेपर्यंत तहकुब

Live Update

11.42 AM : मध्य प्रदेशातील गोवा सरकारच्या कोळसा खाणीचा प्रश्न रोहन खंवटेंकडून उपस्थित, उद्योगमंत्री विश्वजीत राणे यांनी प्रश्न पुढे ढकलण्याची घोषणा केल्यानं खंवटे-सरदेसाई आक्रमक

Live Update

11.40 AM : गोव्याचा सौदा सुरू आहे : विजय सरदेसाई, प्रश्नांना उत्तरं देणं का टाळता? : रोहन खंवटे, हजारो कोटींच्या भ्रष्टाचारासंबंधीच्या प्रश्नांना बगल का? सरदेसाईंचा सवाल, प्रश्नावरील चर्चा पुढे ढकलल्यानं विरोधक आक्रमक,

Live Update

11.30 AM : मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य-सरकारचा निषेध करण्यासाठी विरोधक दंडाला काळ्या फिती बांधून सभागृहात, शिरदोन पंचायतीचा विषय विधानसभेत उपस्थित. (सात सदस्यीय शिरदोन पंचायतीच्या सरपंचांवर चार पंचांनी अविश्वास ठराव मांडला, हा ठराव समंत होऊ नये यासाठी पंचायत घराला कुणीतरी रात्री टाळे ठोकले, शुक्रवारी अखेर हा ठराव पंचायत घराबाहेर खुल्या जागेत चर्चेला घेण्याची वेळ आली, या प्रकरणात सांतआंद्रेचे भाजपचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांचा हात असल्याचा आरोप)

Live Update

आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आणि अखेरचा दिवस

पाहा व्हिडीओ –

Live Update

विधानसभेच्या दुसऱ्या अधिवेशनाचं कामकाज पहाटेपर्यंत सुरु होतं

—————————————————————————————————————-

हे पेज सातत्यानं Update होत आहे, कृपया वाचून झाल्यानंतर Refresh करा. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!