Live Updates | पावसाळी अधिवेशन | दिवस दुसरा | विधानसभेचा आखाडा, ताज्या घडामोडी

हे पेज सातत्यानं Update होत आहे, कृपया वाचून झाल्यानंतर Refresh करा.

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

Live Update

7.20 PM : विजय सरदेसाईंकडून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती, महसूल खाते लक्ष्य, शिक्षण व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित

Live Update

7.05 PM : मोपा पीडितांवर अन्याय, मोपा क्षेत्रातील ऊस लागवड पोलिसांच्या साहाय्यानं आग लावून जाळली : सरदेसाईंचा गंभीर आरोप

Live Update

7.00 PM : मोफत शिक्षण संकल्पना अस्तित्त्वात नाही : विजय सरदेसाई

Live Update

6.54 PM : आयआयटीचं काय झालं? खंवटे आक्रमक

Live Update

6.52 PM : राज्यातील अनेक मालमत्तांच्या विक्रीत संशय, एसआयटीमार्फत चौकशी करा : खंवटे

Live Update

6.50 PM : पर्वरीतील जमीन घोटाळ्याची दखल का घेतली जात नाही? खंवटे आक्रमक

Live Update

6.45 PM : कालबद्ध सेवा देण्यात महसूल विभाग अपयशी : रोहन खंवटे

Live Update

6.42 PM : स्टार्टअप पॉलिसी कुठपर्यंत पोचली? किती जणांना रोजगार मिळाला? खंवटेंचा सवाल, सरकारकडे पैसेच नाहीत!

Live Update

6.38 PM : पाण्याच्या प्रश्नावरून रोहन खंवटे आक्रमक, सिवरेज लाईनवरून प्रश्नांची सरबत्ती, टँकर माफियांचा प्रश्न उपस्थित

Live Update

6.35 PM : सौरउर्जेविषयी स्पष्टता हवी : रोहन खंवटे

Live Update

6.27 PM : बाबासाहेब पुरंदरे यांना विधानसभेत 100व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Live Update

6.02 PM : बालरथ सुरू केल्यानंतर शहरातील शाळांतील विद्यार्थी वाढले : मुख्यमंत्री

Live Update

6.00 PM : इंग्लिशच्या नादात सरकारी शाळा बंद पडल्या : मुख्यमंत्री

Live Update

5.57 PM : यावर्षी तरी शाळांची फी माफ करा : रोहन खंवटे

Live Update

5.35 PM : अभयारण्य क्षेत्रातील लोकांचे प्रश्न सोडवा : प्रसाद गावकर

Live Update

5.25 PM : पत्रादेवी ते पोळेपर्यंतच्या 136 किमी हायवेवरील सर्व त्रुटी 19 डिसेंबरपर्यंत दूर करणार : मुख्यमंत्री

Live Update

5.22 PM : लोकांनी माती नदीपात्रात टाकल्यानं तार नदीला पूर : मुख्यमंत्री

Live Update

5.09 PM : रस्त्यांची कामं करताना सूचना फलक लावा, पोलिसांकडून वाहतुकीवर नियंत्रण ठेवा : फालेरो

Live Update

5.07 :PM हायवे कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचं बांधकाम, या बांधकामात मोठा भ्रष्टाचार : लुईझिन फालेरो

Live Update

5.05 PM : काँक्रिट रोडची तपासणी करा, जीएमसीजवळचा अंडरपास धोकादायक : जयेश साळगावकर

Live Update

5.04 PM : तार नदीचं पाणी तुंबल्यामुळे सांगोल्डाला फटका : जयेश साळगावकर

Live Update

5.02 PM : बस्तोडा ब्रिजकडे संदिग्ध अवस्था, प्रवासी गोंधळतात, अपघातांची शक्यता : जयेश साळगावकर

Live Update

5.00 PM : हायवेच्या निष्काळजीपणानं केलेल्या कामांबद्दल आमदार जयेश साळगावकरांची नाराजी

Live Update

4.55 PM : हायवेच्या कामांची जबाबदारी सरकारनं घ्यावी, हायवेलगत गटार नसल्यानं पाणी तुंबून लोकांच्या घरात, शेतकरी संकटात : खंवटे

Live Update

4.52 PM : हायवेवर खड्डे, अपघातांना जबाबदार कोण? अटल सेतूवरचे खड्डे कोणामुळे? खंवटेंचा सवाल

Live Update

4.50 PM : गिरीतील रस्त्याकडे गंभीर दुर्लक्ष, महामार्गाचा कंत्राटदार सरकारचा जावई आहे का? खंवटेंचा सवाल, हायवेमुळे पाणी तुंबलं, गिरीतील शेतकर्‍यांचं नुकसान

Live Update

4.49 PM : महामार्गांची कामं निकृष्ट, सरकारचं लक्ष नाही का? खंवटे संतप्त

Live Update

4.47 PM : रस्त्यांची कामं करण्यापूर्वी पर्यायी रस्ता उपलब्ध करूनच बांधकामं हाती घ्या : विरोधी पक्षनेते

Live Update

4.40 PM : सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात, शिक्षणावर चर्चा

Live Update

4.05 PM : 15 मिनिटांसाठी सभागृहाचं कामकाज तहकूब

Live Update

4.00 PM : टॉवर घालण्यास अनेक ठिकाणी विरोध : मुख्यमंत्री

Live Update

3.58 PM : आयसीएमआर, केंद्र सरकार यांच्याशी सल्लामसलत करूनच ऑफलाईन शिक्षणाचा निर्णय : मुख्यमंत्री

Live Update

3.56 PM : महाविद्यालयीन शिक्षणाचा 80 टक्के अभ्यासक्रम ऑनलाइन माध्यमातून ‘दिष्टावो’ चॅनलवर : मुख्यमंत्री

Live Update

3.55 PM : नेटवर्कचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही गांभीर्यानं प्रयत्नरत : मुख्यमंत्री

Live Update

3.44 PM : शिक्षकांची संख्या वाढवणं गरजेचं, विद्यार्थ्यांचं नुकसान थांबवा, नियमांत बदल करा : पांडुरंग मडकईकर

Live Update

3.42 PM : कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकरांकडून मराठीत चर्चा

Live Update

3.40 PM : पुन्हा शाळा सुरू करण्याबाबत चाचपणी करायला हवी : सुभाष शिरोडकर

Live Update

3.37 PM : कॉल ड्रॉपवर सरकारची भूमिका काय? मोबाईल टॉवर उभारणार्‍यांबद्दल दाद कोणाकडे मागायची? रेजिनाल्ड

Live Update

3.36 PM : सरकारकडून मोबाईल कंपन्यांना टॉवरसाठी परवानग्या, पण सेवा व्यवस्थित न मिळण्यावर नियंत्रण नाही : रेजिनाल्ड

Live Update

3.35 PM : केंद्र सरकारकडून बीएसएनएलकडे दुर्लक्ष : आलेक्स रेजिनाल्ड

Live Update

3.33 PM : टॉवरचं शुल्क कमी केलं, पण कनेक्टिविटीचा प्रश्न चालूच आहे : आलेक्स रेजिनाल्ड

Live Update

3.30 PM : बीएसएनएलची सेवा तकलादू, वीज गेल्यानंतर कनेक्टिविटी गायब : प्रसाद गावकर

Live Update

3.28 PM : सांगेतील मुलांना कनेक्टिविटीचा प्रश्न सतावतो : प्रसाद गावकर

Live Update

3.22 PM : कॉलेजममधील मुलांना कोविड प्रतिबंधक वॅक्सिनेशन मोहीम सुरू करा : ढवळीकर

Live Update

3.20 PM : ऑनलाईन शिक्षण तूर्त स्थगित करा, तळागाळात नेटवर्क आधी उपलब्ध करून मगच ऑनलाईन शिक्षण सुरू करा : सुदिन ढवळीकर

Live Update

3.15 PM : गरीब मुलांची स्थिती सत्ताधार्‍यांना माहीत नाही, त्यांनी शिक्षण कसं घ्यायचं? शिक्षणासाठी केबल चॅनल्स भाड्यानं घ्या : ढवळीकर

Live Update

3.12 PM : ऑनलाईन शिक्षणाच्या सक्तीवरून ढवळीकर संतप्त, सरकारनं दीड वर्षात ऑनलाईन शिक्षण सुलभपणे मिळण्यासाठी काय केलं?

Live Update

3.05 PM : सरकारी शाळांची अवस्था गंभीर : लुईझिन फालेरो

Live Update

2.56 PM : विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सुविधा मिळणार कधी? विजय सरदेसाई

Live Update

2.54 PM : गरीब मुलांना मोबाईल, टॅब कसे परवडणार? सरकारकडे काहीच उत्तर नाही : विजय सरदेसाई

Live Update

2.50 PM : नेटवर्क कनेक्टिविटीचा प्रश्न गांभीर्यानं सोडवा : रोहन खंवटे

Live Update

2.44 PM : विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी गांभीर्यानं प्रयत्न हवे : रोहन खंवटे, नेटवर्क टॉवरसाठी वीज पुरवठा अखंडित असणं गरणेचं!

Live Update

2.40 PM : ऑप्टीकल फायबर केबल कनेक्शन देऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण द्या : विरोधी पक्षनेते

Live Update

2.37 PM : ऑनलाईन शिक्षण घेण्यात नेटवर्कअभावी अडथळे : विरोधी पक्षनेते

Live Update

2.30 PM : दिवंगतांना श्रद्धांजली वाहून विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात

Live Update

1.14 PM : विधानसभा कामकाज अडिच वाजेपर्यंत तहकूब

Live Update

1.07 PM : एनजीओंवर बंदी आणा : चर्चिल आलेमाव

Live Update

12.59 PM : पर्वरीतील अपूर्ण प्रकल्पांमुळे लोकांना त्रास : रोहन खंवटे, सर्व प्रकल्प तातडीने पूर्ण करा : खंवटे

Live Update

12.55 PM : दाबोळी विमानतळाबाबत एअरपोर्ट ऑथोरिटीकडे पाठपुरावा करण्यासाठी खासदार सार्दिन यांना विनंती करा : मुख्यमंत्री

Live Update

12.48 PM : पेट्रोलच्या किमतीवर नियंत्रण आणा : विजय सरदेसाई

Live Update

12.45 PM : पेट्रोल, डिझेल दरवाढ सरकार रोखणार आहे की नाही? सुदिन ढवळीकर

Live Update

12.44 PM : इंधन दरवाढीवरून सर्वसामान्य वेठीस : ढवळीकर

Live Update

12.35 PM : बलात्कार प्रकरणातील ईश्वर मकवानाविषयी मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण, बाणावली येथील लैंगिक अत्याचार प्रकरणात सहभागी सरकारी कर्मचारी राजेश माने सेवेतून निलंबित

Live Update

12.34 PM : कुठ्ठाळीतील पाण्याचे प्रश्न सोडवण्याची हमी देतो : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Live Update

12.32 PM : कुठ्ठाळीतील पाणी पुरवठ्यातील त्रुटी दूर करणार : पाऊसकर, समाधानकारक उत्तर मिळाल्यानं अ‍ॅलिना साल्ढाणांचं समाधान

Live Update

12.30 PM : पाऊसकरांकडून प्रश्नाला योग्य उत्तर मिळत नसल्यानं अ‍ॅलिना साल्ढाणा नाराज

Live Update

12.29 PM : कुठ्ठाळीत 4 कोटी 90 लाखांची कामे प्रस्तावित : पाऊसकर

Live Update

12.27 PM : कुठ्ठाळी मतदारसंघात पाण्याची टंचाई नाही : पाऊसकर, काही वेळा पाणी पुरवठा कमी दाबाने होतो हे मान्य!

Live Update

12.25 PM : सार्वजनिक बांधकाम खात्याकडून रस्त्यांच्या दर्जेदार कामांना प्राधान्य : पाऊसकर

Live Update

12.15 PM : हेक्टरमागे 25 हजार रुपये भरपाई : कृषीमंत्री बाबू कवळेकर

Live Update

12.14 PM : शेतकरी आधार निधी ठरवता कसा? निकष काय? रोहन खंवटे

Live Update

12.12 PM : नावांतील चुकांमुळे भरपाईचे चेक परत गेले : बाबू कवळेकर

Live Update

12.10 PM : भरपाईची रक्कम हेक्टरमागे 20 हजारावरून 40 हजारावर, भरपाईची मर्यादा 1 लाखावरून 1 लाख 40 हजारांवर

Live Update

12.09 PM : सुदिन ढवळीकरांनी प्रार्थना म्हणून कृषी खात्यावर साधला निशाणा

Live Update

12.07 PM : कृषी खात्याचे अधिकारी कुचकामी : सुदिन ढवळीकर

Live Update

12.05 PM : शेतकर्‍यांना पीक विमा हमी सरकार देणार का? आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स

Live Update

12.02 PM : केंद्र सरकारकडून निधी मिळत नसेल, तर भरपाई कशी देणार? विजय सरदेसाई

Live Update

12.00 PM : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उर्वरित शेतकर्‍यांना भरपाई देणार : कृषीमंत्री बाबू कवळेकर

Live Update

11.55 AM : कृषीमंत्र्यांनी शेतकर्‍यांचा विचार करावा, त्यांना आधार द्यावा : विनोद पालयेकर, कृषीमंत्री बाबू कवळेकरांकडून आधारभूत किंमत दिल्याचा दावा

Live Update

11.53 AM : आरक्षणाच्या प्रश्नावर बोलू न दिल्यानं आमदार रवी नाईक संतप्त

Live Update

11.50 AM : आरक्षणावरून विजय सरदेसाई-मुख्यमंत्र्यांमध्ये घमासान

Live Update

11.45 am – मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासनाची मागणी आम्ही आधीच केली होती, पण हायकोर्टाच्या निर्णयानंतरही सरकार सुप्रीम कोर्टात गेलंच का? – विरोधी पक्षनेते

Live Update

11.44 am – पालिका कायदा आणि पंचायत कायद्याचे सर्व हक्क राज्य निवडणूक आयोगाला दिले जाणार – मुख्यमंत्री

Live Update

11.39 am – वॉर्डनिहाय आरक्षणातील वादावरुन विरोधी पक्षनेत्यांचे सरकारवर गंभीर आरोप, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात जाऊन सरकारनं नेमकं काय सिद्ध केलं?

Live Update

11.35 am – विरोधी पक्षनेत्यांकडून आरक्षणाच्या मुद्द्यावर सवाल

Live Update

बाबू आजगावकरांची प्रतिक्रिया – विमानतळाचं खासगीकरण करणार?

Live Update

विजय सरदेसाईंची अधिवेशनात जाण्याआधीची प्रतिक्रिया

Live Update

11.05 am – पॅरा शिक्षकांचा आझाद मैदानावरुन विधान भवनाच्या दिशेने मोर्चा

Live Update

11 am – विधानसभा अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस

———————————————————————————————————–

हे पेज सातत्यानं Update होत आहे, कृपया वाचून झाल्यानंतर Refresh करा. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!