अजरामर | ‘ते’ 15 कलाकार ज्यांनी 2020मध्ये घेतला जगाचा निरोप

दिग्गज कलाकारांचा 2020मध्ये मृत्यू

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

2020 हे वर्ष सगळ्यांसाठी विचित्र असं वर्ष राहिलं. या वर्षात अनेकांचा जीव गेला. या वर्षात मृत्यूचं महत्त्वाचं कारण ठरलं ते कोरोना. या कोरोनाच्या विचित्र वर्षात अनेक कलाकारही आपण गमावले. 2020 या संपूर्ण वर्षात गमावलेल्या कलाकारांना गोवनवार्ता लाईव्ह या रिपोर्टमधून खास आदरांजली वाहतेय… या वर्षात आपण नेमकं कुणाकुणाला गमावलंय…

1 इरफान खान – 29 एप्रिल 2020

2020या वर्षात इरफान खाननं जगाचा निरोप घेतला. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने इरफान ग्रासला होता. एप्रिल महिन्याच्या शेवटी त्यानं अखेरचा श्वास घेतला.. आज इरफान खान आपल्यात नाही, यावर अजूनही विश्वास बसत नाही. आपल्या सकस अभिनयानं इरफान खाननं चाहत्यांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान तयार केलं होतं. सहज अभिनय करणाऱ्या इरफानला गोवनवार्ता लाईव्हचा सलाम…

2 ऋषी कपूर – 30 एप्रिल 2020

इरफान खानच्या निधनाच्या धक्क्यातून सिनेसृष्टी सावरलीही नव्हती.. की ऋषी कपुर यांच्या निधनाच्या वृत्तानं सगळ्यांच्याच मनाला चटका लावला… बॉबी सिनेमातून बॉलिवूड गाजवलेल्या ऋषी कपूर यांच्या जाण्यानं अनेकजण हळहळले. वयाच्या ६७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हिरोपासून व्हिलनपर्यंतच्या भूमिका लिलया पार पारडणाऱ्या या लेजेंडरी कलाकाराला.. गोवनवार्ता लाईव्हचा सलाम…

3 वाजिद खान – 1 जून २०२०

कोरोनाची लागण आणि हार्टअटॅकच्या झटक्याननं साजीद वाजिद या संगीतकार जोडीतील वाजिद खाननं जगाचा निरोप घेतला. वयाच्या ४७व्या वर्षी वाजिद खानंनं अलविदा केला. प्यार किया तो डरना क्या पासून बॉलिवूडच्या संगीत क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या वाजिद खाननं अनेक हिट गाणी दिली… वाजिद खानच्या जाण्यानं मोठं नुकसान झाल्याची खंत बॉलिवूड संगीत क्षेत्रातील अनेकांनी व्यक्त केलीये. अल्पावधिती जबरदस्त गाणी देणाऱ्या या अवलिया संगितकाराला गोवनवार्ता लाईव्हचा सलाम

4 बासू चटर्जी – 4 जून 2020

९३ वर्षांच्या बासू चटर्जींचं निधन ४ जूनला झालं. दोन वेळा त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. मध्यमवर्गीय कुटुंबावर आधारलेले सिनेमे बनवण्याचं सूत्र बासू चटर्जी यांना पक्क माहीत झालं होतं. ‘रजनीगंधा’, ‘पिया का घर’, ‘चितचोर’, ‘छोटी-सी बात’, ‘स्वामी’, ‘खट्टा-मीठा’, ‘बातों-बातों में’, ‘चमेली की शादी’, ‘मनपसंद’, ‘अपने-पराये’ सारखे सुंदर सिनेमे त्यांनी साकारले. बासू चटर्जी आपल्या सिनेमांमधून नेहमीच आपल्यात जिवंत राहतील. त्यांच्या कलाकृतीला गोवनवार्ता लाईव्हचा सलाम…

5 सुशांत सिंह राजपूत – 14 जून 2020

एका छोटाशा शहरातून मुंबई आलेल्या सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्या केली. ही आत्महत्या सगळ्या बॉलिवूडला हादरवून गेली. मालिकेतून करिअरची सुरुवात करणारा सुशांत ३४ वर्ष जगला. या ३४ वर्षांच्या आयुष्यात त्यानं अनेक दर्जेदार आणि आशयगहन सिनेमे केले. मात्र आत्महत्येनंतर रिलीज झालेला त्याचा दिल बेचारा हा सिनेमाही सगळ्यांनाच मृत्यूबाबत विचार करायला लावणारा असा ठरला. आपल्या कलाकृतीतून वेगळी छाप पाडणाऱ्या या कलाकाराला गोवनवार्ता लाईव्हचा सलाम

6 सरोज खान – 3 जुलै 2020

बॉलिवूडमधील पहिली महिला कोरीओग्राफर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरोख खान यांचा मृत्यू ३ जुलै २०२० रोजी झाला. त्यांच्या जाण्यानं अनेकांनी दुःख व्यक्त केलं. ६८ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी अनेकांना नृत्याचे धडे शिकवले. मास्टरजी म्हणून त्यांची इंडस्ट्रीत ओळख होती. तब्बल तीन वेळा त्यांचा राष्ट्रीय पुरस्कारानं गौरव करण्यात आला होता. ७१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेणाऱ्या सरोज खान यांना गोवनवार्ता लाईव्हचा सलाम

7 राहत इन्दौरी – 11 ऑगस्ट 2020

आंखो में आँखे डाल देख ले.. सारखी दर्जेदार गाणी लिहीणारे.. आणि बुलाती है मगर जाने का नहीं.. सारखी शायरी लिहीणारे ज्येष्ठ गझलकार राहत इन्दौरी यांनी २०२०मध्ये जगाचा निरोप घेतला. ११ ऑगस्ट २०२० रोजी कोरोना आणि हार्टअटॅकने त्यांचा मृत्यू झाला. बंडखोर गझलकार म्हणून त्यांना ओळखलं जायचं. सबका खून शामील है इस मिट्टी मे..
किसी के बाप का हिदोस्तान थोडी है..
अशी ज्वलंत शब्द आपल्या शायरीत गुंफणाऱ्या या अवलिया गझलकाराला…. गोवनवार्ता लाईव्हचा सलाम…

8 पंडीत जसराज – 17 ऑगस्ट 2020

पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करणाऱ्या आलेल्या पंडीत जसराज यांचं १७ ऑगस्ट २०२० रोजी निधन झालं. अमेरिकेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांचं निधन झालं. आपलं संपूर्ण आयुष्य संगीत क्षेत्रासाठी अर्पण करणाऱ्या पंडित जसराज यांना गोवनवार्ता लाईव्हचा सलाम…

9 निशिकांत कामत – 17 ऑगस्ट 2020

मराठीसोबत हिंन्दी सिनेसृष्टीत अदबीनं ज्याचं नाव घेतलं जातं, असा दिग्दर्शक म्हणजे निशिकांत कामत… निशिकांत कामतच्या अकाली जाण्यानं संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली होती… वयाच्या ५०व्या वर्षी निशिकांतनं अखेरचा श्वास घेतला. एका गंभीर आजाराशी निशिकांतची लढाई सुरु होती. डोंबिवली फास्टपासून ते दृश्यम पर्यंत आणि फोर्स पासून ते लय भारी पर्यंत निशिकांतनं केलेलं काम अजरामर मानलं जातं. अशा या मराठमोळ्या दिग्दर्शकाला गोवनवार्ता लाईव्हचा सलाम

10 आशालता वाबगांवकर – 22 सप्टेंबर 2020

मराठी सिनेमाचा सुप्रसिद्ध चेहरा आशालता वाबगांवकर यांनी वयाच्या ७९व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मराठी सोबतच हिंदी सिनेमातही त्यांनी काम केलं होतं. साताऱ्यात एका मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर काही दिवसांतच मृत्यूनं त्यांना गाठलं. आपल्या अभिनयातून सदैव रसिकांच्या मनात अजरामर असणाऱ्या आशालता वाबगांवकर यांना गोवनवार्ता लाईव्हचा सलाम

11 एसपी बालासुब्रम्हण्यम – 25 सप्टेंबर 2020

मधुर आवाजानं रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे एसपी बालासुब्रम्हण्यम यांच्या निधनानं अनेकजण हळहळले. तब्बस ४० हजारपेक्षा जास्त गाणी एसपींनी आपल्या करिअरमध्ये गायली. तमिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी भाषेतही त्यांनी गाणी गायली. सलमान खानसाठी एसपींच्या आवाज हे तर एक समीकरणच बसलं होतं. आपल्या अजरामर गीतांनी एसपी नेहमींच आपल्या सोबत असणार आहेत. त्यांच्या गायकीला गोवनवार्ता लाईव्हचा सलाम

12 फराज खान – 4 नोव्हेंबर 2020

फरेब सिनेमातून फराज खाननं आपल्या करिअरला सुरुवात केली. सिनेमातच नव्हे तर मालिकांमध्येही फराज खाननं काम केलं होतं. नोव्हेंबर २०२०मध्ये फराज खान यांचं निधन झालं. फराज खान यांना गोवनवार्ता लाईव्हचा सलाम

13 आसिफ बसरा – 12 नोव्हेंबर 2020

गेले दोन दशक वेगवेगळ्या भूमिका साकारलेलाय आसिफ बसरा यांनी २०२०मध्ये अखेरचा निरोप घेतला. १२ नोव्हेंबरला त्यांनी आत्महत्या केली. सिनेमा आणि मालिका अशा दोन्हीमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. मात्र त्यांच्या आत्महत्येनं सगळ्यांना धक्का दिला होता.

14 सौमित्र चटर्जी – 15 नोव्हेंबर 2020

बंगाली सिनेमाचे प्रसिद्ध लेखक, अभिनेता, दिग्दर्शक सौमित्र चटर्जी यांनी १५ नोव्हेंबर २०२० रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती. बांगला सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं महत्त्वाचं काम सौमित्र चटर्जी यांनी केलं होतं. अजरामर सिनेमे देणाऱ्या चटर्जी यांना गोवनवार्ता लाईव्हचा मानाचा मुजरा…

15 रवी पटवर्धन – 5 डिसेंबर 2020

वयाच्या ८४व्या वर्षी रवी पटवर्धन यांचं निधन झालं. नाटक, सिनेमा, मालिका अशा सर्वच क्षेत्रांत त्यांनी दमदार अभिनय केला होता. मराठीसोबत हिन्दी सिनेमातही त्यांनी जबदरस्त काम केलं होतं. आपल्या अभिनयातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या रवी पटवर्धन यांना गोवनवार्ता लाईव्हचा मानाचा मुजरा..

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!