गोवन वार्ताच्या दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

गोव्यातील साहित्यिकांना प्राधान्य

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : दैनिक गोवन वार्ताच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन शुक्रवारी, धनत्रयोदशीला थाटात पार पडलं. हा वैभवशाली सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत ताज हॉटेल अँड कन्वेन्शन सेंटर, दोनापावला इथं पार पडला.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर, फोमेन्तो मीडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर अंबर तिंबलो, महाराष्ट्राचे माहिती आणि जनसंपर्क महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, गोवन वार्ताचे संपादक संजय ढवळीकर आणि गोवन वार्ता लाईव्हचे संपादक किशोर नाईक गावकर व्यासपिठावर उपस्थित होते.

यावेळी गोवन वार्ताचे संपादक संजय ढवळीकर म्हणाले, जून 2015 मध्ये गोवन वार्ता वर्तमानपत्र सुरू झालं. त्या वर्षापासून आतापर्यंत खंड न पडता दरवर्षी दिवाळी अंक काढला जातोय. सर्व जाहिरातदार, वितरण यंत्रणा, सर्व सहकारी यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झालं. दिवाळी अंकाचा स्वत:चा एक खास वाचकवर्ग आहे. दिवाळी अंकातील लेखनातून अनेक साहित्यिक घडले. गोवन वार्तानं दिवाळी अंकात गोव्यातील साहित्यिकांना प्रतिनिधित्व दिलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!