अभिमानास्पद! गोवा जलतरणपटू संजना प्रभुगावकरचा नवा विक्रम

दुबईतील जलतरण स्पर्धेत 100 मीटर बॅकस्ट्रोक जलतरण प्रकारात न्यू यूएई स्विमिंग रेकॉर्ड केला प्रस्थापित

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गोमंतकन्या संजना प्रभुगावकर या जलतरणपटूने आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याचं नाव उज्ज्वल केलंय. दुबई यूएई येथे झालेल्या स्पर्धेत या 14 वर्षीय जलपरीने नवा विक्रम केलाय. 100 मीटर बॅकस्ट्रोक जलतरण प्रकारात तिने न्यू यूएई स्विमिंग रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. तसंच 5 जलतरण प्रकारांमध्ये तिने 4 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक जिंकून गोव्याच्या या जलपरीने गोव्याची मान अभिमानाने उंचावली आहे.

हेही वाचाः येत्या 2 महिन्यात तुये सरकारी हॉस्पिटलात कोविड केअर सेंटर सुरू करणार

हमदान स्विमिंग पूल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पार पडली स्पर्धा

9 आणि 10 एप्रिल 2021 रोजी दुबई यूएईच्या हमदान स्विमिंग पूल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या अपेक्स फर्स्ट स्विमिंग कम्युनिटी ओपन चॅम्पियनशिप 2021 स्पर्धेत 14 वर्षं मुलींच्या गटातून संजनाने भाग घेतला. या स्पर्धेतील 5 जलतरण प्रकारांमधून ती सहभागी झाली.

हेही वाचाः पीएनबी घोटाळाः मेहुल चोक्सी अँटिग्वामधूनही फरार

4 सुवर्ण आणि 1 रौप्यपदकाची मानकरी

संजनाला  200 मीटर वैयक्तिक मेडली, 100 मीटर बॅकस्ट्रोक, 200 मीटर बॅकस्ट्रोक आणि 50 मीटर बॅकस्ट्रोक जलतरण प्रकारात सुवर्णपदक, तर 200 मीटर फ्रीस्टाईल जलतरण प्रकारात रौप्य पदक प्राप्त झालं.

हेही वाचाः भररस्त्यात आढळून आलेली मगर नेमकी गेली कुठे?

नवा विक्रम

दुबई यूएईमध्ये स्थित अ‍ॅक्वा नेशना स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीच्या वतीने संजनाने जलतरण स्पर्धेत भाग घेतला. तसंच पाचही जलतरण प्रकारातून तिने 100 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात ‘न्यू यूएई स्विमिंग रेकॉर्ड’ प्रस्थापित केला.

हेही वाचाः आयएमए, फार्मा कंपन्यांना योगगुरुंचे 25 प्रश्न

आत्तापर्यंत जिंकलेली बक्षिसं

संजनाने आत्तापर्यंत राज्य, आंतरराज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध जलतरण स्पर्धांमधून भाग घेतलाय. आजवर 92 सूवर्ण पदकं, 28 रौप्य पदकं, तर 13 कांस्य पदकं तिच्या खात्यात जमा आहेत. तसंच तिला देशात राज्य स्तरावर आणि आंतरराज्य स्तरावर 9 वैयक्तिक चॅम्पियनशिप ट्रॉफी मिळाल्या आहेत.

हा व्हिडिओ पहाः Positive मुलाखत | Video | स्वतःच्या फार्म हाऊसचं कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतर

दुबईतील अ‍ॅक्वा नेशना स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी एलएलसी येथे प्रशिक्षण

तीन दशकांचा अनुभव असलेले द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आणि राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक सर प्रदीप कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅक्वा नेशना स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी एलएलसी येथे संजना सध्या दुबईत पूर्णवेळ स्पर्धात्मक जलतरण प्रशिक्षण घेत आहे. ही एक नवीन युगातील क्रीडा प्रशिक्षण देणारी अ‍ॅकॅडमी असून या अ‍ॅकॅडमीचं मुख्यालय दुबईतील स्विस इंटरनॅशनल सायंटिफिक स्कूल येथे आहे. संजना सध्या इयत्ता 9 वीत शिकत असून गेल्या 9 वर्षांपासून गोव्याच्या क्रीडा प्राधिकरणात ती जलतरण क्रीडा प्रकाराचं नियमित कोचिंग घेत आहे आणि विविध राज्य, आंतरराज्य, राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून ती सहभागी झाली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!