धडाकेबाज! सापळा रचून गोवा बनावटीची दारू पकडली

कणकवलीजवळ २.२५ लाखाचा मुद्देमाल जप्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर कासार्डेच्या दिशेने स्विफ्टकार मधून गोवा बनावटीची ७५ हजार किमतीची विनापरवाना दारू वाहतूक करत असताना कणकवली पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपीसह मुद्देमाल जप्त केलाय. ही कारवाई १४ एप्रिल रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास कासार्डे इथं महामार्गावर करण्यात आली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, हवालदार रुपेश गुरव, रमेश नारनवर, नितीन खाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा – DARU | गोव्याची दारु महाराष्ट्रात नेताय? मग हे बघाच!

या कारवाईत दारू आणि स्विफ्ट कार मिळून २ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत रमेश नारनवरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी यतीन उर्फ शरद डिचोलकर (रा. आंबेरी – तालुका मालवण) याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

…असा रचला सापळा

याबाबत नारनवर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, महामार्गावरून स्विफ्ट कारमधून विनापरवाना दारू वाहतूक होत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी याबाबत कासार्डे दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार रमेश नारनवरे यांना फोनद्वारे कल्पना दिली. MH 01 VA 1998या नंबरची स्विफ्ट कार ही कासार्डे येथे थांबविण्याची सूचना केली. त्यानुसार नारनवर आणि खाडे यांनी कासार्डे येथे महामार्गावर पोकळे पेट्रोल पंपाजवळ सापळा रचला. या गाडीचा नांदगावपासून कासार्डे पर्यंत श्री खरात आणि गुरव यांनी आपल्या खाजगी वाहनाद्वारे पाठलाग सुरू ठेवला होता.

हेही वाचा – Video | बांद्यानंतर सावंतवाडीचा नंबर, लाखोंची दारु हस्तगत, पोलिसांची मोठी कारवाई

धडाकेबाज कारवाई

महामार्गावरून नांदगाव येथूनस्विफ्ट कार कासार्डेच्या दिशेने क्रॉस झाल्याची माहिती थांबलेल्या कासार्डेतील पोलिसांना देण्यात आली. कासार्डे येथे स्विफ्ट कार दिसताच तिथे असलेल्या पोलिसांनी कार थांबवली. या पाठोपाठ पाठलाग करत असलेले खरात आणि गुरव हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारची तपासणी केली असता कारच्या डिकीत २५ बॉक्स मध्ये गोल्डन एस ब्ल्यू फाईव्ह व्हीस्की दारू आढळून आली. लॉकडाऊनची अंमलबजावणी होत असतानाच गोव्याहून विनापरवाना दारू साठा करण्याचा प्लान कणकवली पोलिसांनी धडक कारवाई करत उधळून लावलाय.

हेही वाचा – दारूविक्री दुकानांना आता पाच वर्षांसाठी परवाना नूतनीकरण

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!