जोपर्यंत तरुणांना रोजगार मिळत नाही तोपर्यंत देणार 3000 रुपये: केजरीवाल

विधानसभा निवडणुकीपूर्वी गोव्यातील नोकऱ्यांबाबत 'आप'च्या सात मोठ्या घोषणा

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गोव्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीने (आप) मंगळवारी पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील तरुणांना डोळ्यासमोर ठेवून रोजगार हा मुद्दा मोठा बनवला. यावेळी केजरीवाल यांनी सात मोठ्या घोषणा केल्या आहेत.

गोव्यातील प्रत्येक पात्र तरुणाला सरकारी नोकरी मिळेल

केजरीवाल म्हणाले, तरुणांना मला सांगायचंय की जर कोणाला इथे सरकारी नोकरी हवी असेल, तर त्यांची ओळख एका मंत्र्याशी झाली पाहिजे. आमदार-मंत्री यांना लाच दिल्याशिवाय, त्यांच्या शिफारशीशिवाय गोव्यात सरकारी नोकरी मिळणं अशक्य आहे. गोव्यात ‘आप’ने सरकार स्थापन केल्यास आम्ही ही गोष्ट संपवू. गोव्यातील प्रत्येक पात्र तरुणाला सरकारी नोकरी मिळेल.

केजरीवाल यांनी केलेल्या या सात घोषणा

प्रत्येक सरकारी नोकरीवर सामान्य युवकाचा हक्का असेल. यंत्रणा पारदर्शक बनवू.

राज्यातील प्रत्येक घरातून एका बेरोजगार युवकाला सरकारी नोकरी देणार.

जोपर्यंत रोजगार उपलब्ध होत नाही, तोपर्यंत दरमहा तीन हजार रुपये बेरोजगारी भत्ता म्हणून दिला जाईल.

80 टक्के नोकऱ्या राज्यातील तरुणांसाठी राखीव असतील. आम्ही खाजगी नोकऱ्यांमध्येही अशा प्रणालीसाठी कायदा आणू.

कोरोनामुळे पर्यटनावर परिणाम झाला. जोपर्यंत पर्यटनावर अवलंबून असलेल्या लोकांचा रोजगार रुळावर येत नाही, तोपर्यंत अशा कुटुंबांना दरमहा पाच हजार रुपये देणार.

खाणकामावर अवलंबून असलेली कुटुंबांना त्यांचं काम सुरू होईपर्यंत दरमहा पाच हजार रुपये दिले जातील.

रोजगार निर्मितीसाठी कौशल्य विद्यापीठ उघडले जाईल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!