गोवा विद्यापीठाचे ऑनलाइन वर्ग 7 जूनपर्यंत रद्द

परिपत्रक जारी करून दिले आहेश; राज्यव्यापी कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्यातील कोरोनाच्या वाढत्या उद्रेकाचा फटका शिक्षण विभागालाही बसलाय. महाविद्यालये तसंच गोवा विद्यापीठाने राज्यव्यापी कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर आपले ऑनलाईन वर्ग रद्द केले आहेत. गोवा विद्यापीठाने 10 मे रोजी परिपत्रक जारी करून विद्यापीठाचे ऑनलाईन वर्ग 24 मे पर्यंत बंद ठेवणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर 21 मे रोजी गोवा विद्यापीठाने पुन्हा एक परिपत्रक जारी करत यात बदल केले होते आणि 31 मे पर्यंत ऑनलाईन वर्ग पुढे ढकलले होते. आता पुन्हा एकदा गोवा विद्यापीठाचे ऑनलाईन वर्ग काही काळासाठी बंद ठेवणार असल्याचं परिपत्रक जारी करत म्हटलंय.

हेही वाचाः नामांकित बॉक्सिंग प्रशिक्षक ओमप्रकाश भारद्वाज कालवश

7 जूनपर्यंत ऑनलाईन वर्ग बंद

गोवा विद्यापीठाने 29 मे रोजी एक परिपत्रक जारी केलंय, ज्यात असं म्हटलंय, की विद्यापीठाने विद्यापीठ कॅम्पस आणि त्याच्याशी संलग्न महाविद्यालयांमध्ये देऊ केलेल्या ऑनलाइन वर्गांचं आयोजन 7 जूनपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. तसंच हा 1 जून ते 7 जून हा कालावधी विद्यार्थी, शिक्षण आणि कर्मचाऱ्यांसाठी सुट्टी म्हणून घोषित केला आहे. मात्र, सुट्टी नसलेले कर्मचारी त्यांची संचालनालये/संस्थांकडून पुढील आदेश येईपर्यंत घरून काम सुरू ठेवतील असं गोवा विद्यापीठाकडून सांगण्यात आलंय.

राज्यव्यापी कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर गोवा विद्यापीठाचा निर्णय

कोव्हिड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यात लागू करण्यात आलेली संचारबंदी/कर्फ्यू 7 जूनपर्यंत वाढवण्यात आलाय. त्याच धर्तीवर गोवा विद्यापीठाने विद्यापीठ कॅम्पसमध्ये आणि संलग्न महाविद्यालयांमधील ऑनलाइन वर्ग 7 जूनपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचं गोवा विद्यापीठाने म्हटलंय. वैधानिक परिषदा/ संस्थांद्वारे नियंत्रित व्यावसायिक कार्यक्रम देणारी संलग्न महाविद्यालये या संदर्भात आपापल्या परिषदांच्या मार्गदर्शक तत्त्वांचं/सल्ल्याचं पालन करतील, असंही गोवा विद्यापीठाने नमूद केलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!